Astrology 2023 : मे महिन्यात शुक्र, सूर्य आणि मंगळ ग्रह करणार राशी बदल, या जातकांना मिळेल पाठबळ

May 2023 Astrology : एप्रिल महिना आता संपण्याच्या उंबरठ्यावर असून मे महिन्याचे वेध लागले आहेत. मे महिन्यात आपलं ग्रहमान कसं असेल याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. चला जाणून घेऊयात कोणते ग्रह राशी बदल करणार ते..

Astrology 2023 : मे महिन्यात शुक्र, सूर्य आणि मंगळ ग्रह करणार राशी बदल, या जातकांना मिळेल पाठबळ
Astrology 2023 : मे महिन्यात शुक्रासह सूर्य मंगळ करणार राशी परिवर्तन, 5 राशींची होणार चांदी
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 1:04 PM

मुंबई : मे महिना अवघ्या काही दिवसात सुरु होणार आहे. या महिन्यात ग्रहांची स्थिती कशी असेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोणता शुभ अशुभ योग तयार होणार आहे. याबाबत माहिती घेतली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तीन मोठे ग्रह मे महिन्यात राशी परिवर्तन करणार आहे. यामुळे सूर्य, शुक्र आणि मंगळ ग्रहाचा समावेश आहे. सूर्य ग्रहाने राशी परिवर्तन करताच ग्रहण योग सुटणार आहे. मात्र मेष राशीतील राहु आणि गुरुच्या युतीमुळे चांडाळ योग 30 ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहे.

भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह 2 मे रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 10 मे रोजी ग्रहांचा सेनापती असा दर्जा असलेला मंगळ ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. ग्रहांचा राजा असलेला सूर्य ग्रह 15 मे रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या परिवर्तनाला वृषभ संक्रांती असं म्हटलं जातं. या परिवर्तनाचा शुभ अशुभ परिणाम दिसून येईल.

या राशींवर ग्रहांचा शुभ परिणाम होईल

मिथुन : मे महिन्यात होणारं ग्रहांचं गोचर मिथुन राशीला फायदेशीर ठरेल असं आहे. नोकरी आणि व्यवसायात अनुकूल परिणाम दिसून येतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील.

सिंह : या राशींच्या जातकांवर तसा कोणत्याच ग्रहांची अशुभ स्थिती नाही. त्यामुळे ग्रहांचा गोचर सिंह राशीसाठी फलदायी ठरेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते. तसेच मेहनतीला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्त्रोत निर्माण झाल्याने आनंदी राहाल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक असेल.

वृश्चिक : या राशींवर शनिची अडीचकी सुरु आहे. पण इतर ग्रहांची सकारात्मक दृष्टी दिसत आहे. सकारात्मक वातावरणामुळे तुम्ही आनंदी राहाल. नवीन नोकरी चालून येईल. योग्य पगारवाढ मिळत असल्याने तुम्हीही खूश व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल.

मकर : आर्थिक चांगली करणारं ग्रहमान आहे. त्यामुळे या महिन्यात चांगली बचत कराल. खर्चावर नियंत्रण आल्याने दिलासा मिळेल.तसेच आरोग्य विषयक तक्रारीही दूर होतील. समाजात मानसन्मान वाढेल. पैशांची आवक सुरु राहिल्याने नव्या योजना हातात घ्याल.

मीन : या राशीच्या जातकांना साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. असं असलं तरी इतर ग्रहमान चांगली फळं देईल असं आहे. कौटुंबिक स्तरावर तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे जोखिम पत्कारून मोठं काम करू शकता. पैशांचा व्यवहार करताना मात्र काळजी घ्या. अन्यथा फसवणूक होऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.