Astrology 2023 : लक्ष्मी नारायण योगामुळे धनलाभाची स्थिती, या राशीच्या जातकांना मिळणार जबरदस्त पैसा
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचा एक स्वभाव असतो. या स्वभावानुसार प्रत्येक ग्रह आपला प्रभाव टाकत असतो. गोचर कालावधीनुसर एकापेक्षा अधिक ग्रह येतात. शुक्र आणि बुधाच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण शुभ योग तयार होत आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांची स्थिती आपला प्रभाव राशीचक्रावर पाडत असतो. त्यामुळे त्या त्या ग्रहाच्या गुणधर्माप्रमाणे भाकीत वर्तवलं जातं. गोचर कालावधी कमी अधिक असल्याने एकाच राशीत एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र येतात. त्यामुळे शुभ अशुभ योगाची स्थिती निर्माण होते. जुलै महिन्यात गोचर आणि युतीचा प्रभाव राशीचक्रावर पडणार आहे. जुलै महिन्यात बुध आणि शुक्र युती होणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील लक्ष्मी नारायण योग शुभ मानला जातो. या योगाचा तीन राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या नशिबवान राशी कोणत्या आहेत त्या…
जुलै महिन्यात या राशींचं नशीब चमकणार
मेष : जुलै महिन्यात शुक्र आणि बुधाची युती होत आहे. या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. यामुळे मेष राशीच्या जातकांवर शुभ परिणाम दिसून येणार आहे. हा योग या राशीच्या चतुर्थ स्थानात तयार होते. या काळात वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. तसेच भौतिक सुखांची प्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना दिलासा मिळेल. काही जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगली वेळ आहे. रियल इस्टेट, जमिनीशी निगडीत लोकांना धनलाभ मिळणार आहे.
तूळ : या राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण योगाचा लाभ मिळणार आहे. हा योग कुंडलीच्या कर्मभावात तयार होणार आहे. या काळात जातकाला उद्योग धंद्यात अपेक्षित यश मिळेल. करिअरसाठी ही वेळ चांगली आहे. नोकरीच्या नवीन संधी प्राप्त होतील. नव्या लोकांशी भेटीगाठी होतील. व्यापारी वर्गाला युतीचा जबरदस्त फायदा होईल. भविष्यासाठी काही नवीन योजना आखाल.
मकर : या राशीच्या जातकांच्या सप्तम भावात शुक्र-बुध युती तयार होत आहे. लक्ष्मी नारायण योगामुळे या राशीच्या जाताकांना चांगला फायदा होईल. वैवाहित जीवन सुरळीत चालेल. अविवाहित लोकांना नवीन स्थळं चालून येतील. पार्टनरशिपच्या कामात यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)