Astrology 2023 : कर्क राशीत जुळून येणार लक्ष्मी योग, या राशीच्या जातकांना होणार फायदा
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचरासोबत शुभ अशुभ योग जुळून येतात. यामुळे मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम दिसून येतो. असाच एक शुभ लक्ष्मी योग कर्क राशीत जुळून येणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक स्वभाव आहे. त्यानुसार तो त्याची फळ देत असतो. पण शुभ ग्रह पाप ग्रहासोबत एकत्र आला तर मात्र त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. कधी कधी ग्रहांच्या युतीमुळे शुभ योगही तयार होतात. असाच एक शुभ योग कर्क राशीत तयार होणार आहे. मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे लक्ष्मी योग तयार होणार आहे. हा शुभ योग असून काही जातकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार 10 मे 2023 रोजी मंगळ ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर चंद्र हा 22 मे 20233 रोजी मिथुन राशीत असणार आहे. त्यानंतर 24 मे 2023 रोजी चंद्र ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे लक्ष्मी योग तयार होत आहे. या योगामुळे तीन राशींना फायदा होणार आहे.
या तीन राशींना होणार फायदा
मिथुन : कर्क राशीत तयार होणाऱ्या लक्ष्मी योगाचा फायदा मिथुन राशीच्या जातकांना होणार आहे. कारण या दुसऱ्या स्थानात म्हणजेच धनस्थानात लक्ष्मीयोग तयार होणार आहे. धनस्थान आणि लक्ष्मीयोगामुळे या राशीच्या जातकांना फायदा होईल. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता या काळात आहे. उत्पन्नाचे काही नवीन स्रोत निर्माण होतील. तसेच गुंतवणुकीतून भविष्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कन्या – या राशीच्या एकादश भावात लक्ष्मीयोग तयार होत आहे. हे स्थान उत्पन्न आणि लाभाचं स्थान आहे. त्यामुळे या स्थानात लक्ष्मी योग तयार होत असल्याने या राशीच्या जातकांना त्याचं फळ मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो.
तूळ – या राशीच्या दहाव्या स्थानात लक्ष्मीयोग तयार होणार आहे. करिअरशी निगडीत हे स्थान आहे. त्यामुळ लक्ष्मीयोगामुळे करिअरमध्ये चांगले परिणाम दिसून येतील. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच मनासारखा पगार वाढून मिळू शकतो. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. तसेच नवीन मालमत्ता खरेदीचा करण्याचा योग जुळून येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)