Astrology 2023 : 20 जुलैपासून महालक्ष्मी योग, सव्वा दोन दिवस या राशींसाठी चांगली स्थिती

चंद्राची स्थिती गोचर कुंडलीत खूप महत्त्वाची ठरते. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे चंद्रकलेनुसार मनस्थिती बदलत असते. चला जाणून चंद्राच्या शुभ योगामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

Astrology 2023 : 20 जुलैपासून महालक्ष्मी योग, सव्वा दोन दिवस या राशींसाठी चांगली स्थिती
20 जुलै ते 22 जुलैपर्यंत महालक्ष्मी योग, या राशीच्या जातकांना मिळणार लाभ
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 8:14 PM

मुंबई : चंद्राच्या गोचरामुळे दर सव्वा दोन काही ना योगाची स्थिती होत असते. यात काही शुभ योग असतात तर काही अशुभ योग असतात. त्यामुळे शुभ अशुभ योगाकडे जातकांचं लक्ष लागून असतं. चंद्र कोणत्या ग्रहासोबत स्थित आहे कोणत्या पक्षात बसला आहे. यावरून त्याची बलस्थिती समजून येते. 20 जुलै 2023 रोजी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत मंगळ ग्रहासोबत युतीमुळे लक्ष्मी योग तयार होणार. तर शुक्रासोबत युतीमुळे कलात्मक योग तयार होणार आहे. या योगामुळे या राशीच्या जातकांना फायदा होणार आहे. चंद्र मंगळ युतीमुळे जतकांना धन संपत्ती, यश आणि समाजात मानसन्मान मिळतो. 22 जुलै 2023 चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत रात्री 11 वाजून 42 मिनिटांनी प्रवेश करेल. त्यानंतर महालक्ष्मी योग आणि कलात्मक योग संपुष्टात येईल.

कोणत्या राशीच्या जातकांना होणार फायदा जाणून घ्या

मिथुन : या राशीच्या द्वितीय स्थानात हा योग तयार होत आहे. त्यामुळे प्रगतीची दार खुली होतील. तसेच लाभाच्या काही संधी चालून येतील. अचानकपणे प्रवासाचा योग जुळून येईल. मुलांची प्रगती पाहून खूश व्हाल. जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.

कन्या : कन्या राशीच्या एकादश भावात हा योग तयार होत आहे. उत्पन्न या काळात वाढू शकते. नव्या व्यवसायाच्या संधी चालून येतील. वडील किंवा सासरहून धनलाभ होऊ शकतो. संतान प्राप्तीची गोड बातमी कानावर पडेल. आरोग्य विषयक तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. तसेच वाणीवर नियंत्रण ठेवा. आपल्यामुळे कोणाला दु:ख होईल असं वागू नका.

तूळ : या राशीच्या जातकांना व्यवसायात प्रगती होताना दिसेल. धनलाभ झाल्याने चिंता दूर होईल. भाग्याची पूर्ण साथ मिळाल्याने आनंदी व्हाल. आळस झटकून कामाला लागणं गरजेचं आहे. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. नक्कीच लाभ होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.