Mangal Ketu Yuti : मंगळ आणि केतुची तूळ राशीत होणार अभद्र युती, तीन राशींनी 27 दिवस जरा सांभाळूनच

Astrology : पापग्रहांची युती आघाडीमुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. मंगळ आणि केतु यांची गणना पापग्रहात केली जाते. हे दोन्ही ग्रह तूळ राशीत एकत्र येणार आहेत. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल.

Mangal Ketu Yuti : मंगळ आणि केतुची तूळ राशीत होणार अभद्र युती, तीन राशींनी 27 दिवस जरा सांभाळूनच
Mangal : मंगळ आणि केतुच्या युतीमुळे तीन राशींचं टेन्शन वाढणार, ग्रहांच्या स्थितीमुळे बसणार जबरदस्त फटका
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 4:12 PM

मुंबई : मंगळ ग्रहाच्या स्थिती 3 ऑक्टोबरपासून बदल होणार आहे. मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तूळ राशीचं स्वामित्व शुक्र ग्रहाकडे आहे. शुक्र आणि मंगळ यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध आहेत. पण केतुसोबत युती होणार असल्याने तीन राशीच्या जातकांना जबर फटका बसू शकतो. 3 ऑक्टोबरला मंगळ ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. दुसरीकडे केतु हा ग्रह या राशीत 30 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे मंगळ आणि केतुची अभद्र युती 27 दिवस दिवस असणार आहे. 27 दिवसांचा कालावधी तणावपूर्ण असणार आहे. तसेच नकारात्मक फळं भोगावी लागू शकतात. जातकांना हाडांशी निगडीत विकारांचा सामना करावा लागू शकतो. तसेच प्रॉपर्टीशी निगडीत वाद उद्भवू शकतात. त्यामुळे 27 दिवस तीन राशीच्या जातकांना काळजी घेणं गरजेचं आहे.

तीन राशीच्या जातकांना काळजी घेणं आवश्यक

मिथुन : या राशीच्या जातकांना मंगळ आणि केतुच्या युतीमुळे फटका बसू शकतो. आईच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच मानसिक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. कोणाकडून मदतीची अपेक्षा ठेवली तरी ती मिळणार नाही. त्यामुळे संबंधात तणाव निर्माण होईल. तसेच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या कालावधीत वाहन चालवताना काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच लांबचा प्रवास करणं टाळा.

कर्क : मंगळ आणि केतुच्या युतीमुळे कामांमध्ये अडथळे निर्माण होतील. अभ्यास आणि मुलांच्या प्रगतीत बाधा येऊ शकते. मुलांचं मन विचलीत होईल. तसेच आपण सांगितलेल्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतील. नातेवाईकांकडून विनाकारण त्रास दिला जाईल. तसेच भांडणं होत असल्याने मन रमणार नाही. मित्रांकडून अडचणीच्या काळात पाठ दाखवली जाईल. कामाच्या ठिकाणी ताण वाढेल. नोकरी बदलण्याची घाई करू नका.

तूळ : याच राशीत मंगळ आणि केतुची युती होत आहे. विनाकारण पैसा खर्च होईल. त्यामुळे आर्थिक गणित बिघडून जाईल. एखादा प्रोजेक्ट हाती येता येता जाईल. तुमच्यावर जबाबदारी वाढेल पण आर्थित स्थिती खराब असल्याने हतबल व्हाल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. वैवाहिक जीवनातही अडचणींचा सामनाा करावा लागू शकतो. सासरच्या मंडळींसोबत वाद होऊ शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.