Mangal Ketu Yuti : मंगळ केतुची तूळ राशीत होणार युती, तीन राशींना पडणार भारी
Mangal Ketu Yuti : ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि केतु हे दोन्ही पापग्रह आहेत. त्यामुळे ग्रहांच्या युतीने अंगारक योग तयार होतो. हा योग अशुभ योग मानला जातो आणि राशीचक्रावर परिणाम होतो. तीन राशींना जबर फटका बसू शकतो.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या उलथापालथीमुळे राशीचक्रावर परिणाम होतो. ऑक्टोबर महिन्यात ग्रहांची बरीच उलथापालथ होणार आहे. खासकरून मेष राशीतील गुरु चांडाळ योग संपुष्टात येणार आहे. पण महिन्याच्या सुरुवाताली तूळ राशीत मंगळ आणि केतुची युती होणार आहे. काही महिन्यांपूर्वी मेष राशीत मंगळ आणि राहुची युती झाली होती. तेव्हा त्याचे विपरीत परिणाम दिसून आले होते. आता तूळ राशीत दोन पापग्रह येणार आहेत. मंगळ ग्रह 3 ऑक्टोबरला कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत केतु आधीच ठाण मांडून बसला आहे. ही युती 30 ऑक्टोबरपर्यंत कायम राहील. त्यानंतर केतु ग्रह तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल आणि अभद्र युती संपुष्टात येईल. पण 27 दिवस तीन राशीच्या जातकांना त्रास सहन करावा लागणार आहे. चला जाणून घेऊयात याबाबत…
तीन राशीच्या जातकांना बसेल फटका
वृषभ : मंगळ आणि केतुची युती या राशीच्या जातकांना त्रासदायक ठरणार आहे. 27 दिवसांचा कालावधी डोकेदुखी वाढवणारा राहील. काही कामं होता होता राहून जातील. कामाच्या ठिकाणी प्रेशर येईल. काही किचकट कामामुळे वेळ वाया जाईल. तसेच हाती काहीच लागणार नाही. कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या. आतातायीपणा करू नका. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतो.
मिथुन : या राशीच्या जातकांनाही फटका बसणार आहे. वैयक्तिक आयुष्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळेल. घरात छोट्या छोट्या कारणावरून वाद होताना दिसतील. मानसिक स्थितीही खालावलेली राहील. व्यवसायात मोठं नुकसान होऊ शकतं. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शक्यतो आर्थिक जोखिम घेणं टाळलं तर बर होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.
कन्या : या राशीच्या जातकांना पावलापावलांवर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक गणित या कालावधीत बिघडेल. विनाकारण काही गोष्टींवर पैसा खर्च करावा लागेल. वैवाहिक जीवनात मोठी उलथापालथ पाहायला मिळेल. प्रवास करताना काळजी घ्या. गरज नसताना लांबचा प्रवासाची योजना आखू नका. वाहन सावधपणे चालवा. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)