Astrology 2023 : मेष राशीत 14 एप्रिलपासून महिनाभर पितृदोष योग, या तीन राशींची अडचण वाढणार
ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल 2023 हा महिना खूपच उलथापालथ करणारा आहे. कारण जवळपास सर्वच मोठे ग्रह राहुच्या आसपास आहेत. त्यामुळे काही अशुभ योगांची स्थिती निर्माण होणार आहे.
मुंबई : ग्रहांच्या दृष्टीकोनातून एप्रिल 2023 हा महिना सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात बरेच मोठे ग्रह राशी बदल करणार आहेत. त्यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होणार आहे. सूर्यदेव, गुरु ग्रह, शुक्र या ग्रहांचं राशी बदल होणार आहे. सूर्यदेव 14 एप्रिल 2023 रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत राहु ग्रह ठाण मांडून आहे. त्यामुळे दोन ग्रहांच्या युतीमुळे ग्रहण आणि पितृ दोष योग निर्माण होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला पिताचा दर्जा देण्यात आला आहे. पितृदोषात राहु आणि सूर्याची युती होते आणि त्यावर शनिची दृष्टी असते.
दुसरीकडे, शनि आणि सूर्याची युती असते आणि त्यावर राहुची नजर असल्यास पितृदोष तयार होतो. 14 एप्रिलपासून 15 मे पर्यंत सूर्यदेव मेष राशीत असणार आहेत. त्यामुळे पितृदोष महिनाभर राहील. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना फटका बसणार आहे. त्यामुळे या काळात काळजी घेणं गरजेचं आहे.
या तीन राशींना बसणार फटका
कन्या – या राशीच्या अष्टम भावात पितृदोष तयार होत आहे. त्यामुळे महिनाभराचा अवधी तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. आरोग्यविषयक तक्रारीही या काळात जाणवू शकतात. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तीची तब्येत या काळात ढासळू शकते. जोडीदारासोबत विनाकारण वाद होऊ सकतो. त्यामुळे या काळात वाणीवर नियंत्रण ठेवा. गाडी चालवताना या काळात काळजी घ्या. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – या राशीच्या षष्टम भावात पितृदोष तयार होत आहे. त्यामुळे जातकांना अशुभ काळातून जावं लागेल. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला फटका बसू शकतो. निकाल शत्रूपक्षाच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. एखादा जुनाट आजार डोकं वर काढू शकतं. पोटाचा त्रास या काळात वाढू शकतो. आईच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. नवं काम सुरु करण्यास चांगला काळ नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी मेहनत घ्यावी लागेल.
कुंभ – या राशीत शनिदेव विराजमान आहेत. त्या तिसऱ्या स्थानात पितृदेोष तयार होता आहे. त्यामुळे त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येईल. सांधेदुखीचा त्रास या काळात वाढू शकतो. त्याचबरोबर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायातही तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शत्रूपक्ष तुमच्या हावी होऊ शकतो. विनाकारण काही कामासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. पण काम न झाल्याने निराशी पदरी पडू शकते. गुंतवणूक करताना काळजी घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)