Astrology 2023 : दीड महिन्यात राहु करणार देवगुरुंच्या राशीत प्रवेश, तीन राशींना मिळणार जबरदस्त लाभ
Rahu Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रह झटपट राशी बदल करतात. तर काही ग्रह एकाच राशीत अधिक काळ ठाण मांडून बसतात. यात शनिनंतर राहु आणि केतु हे दोन पापग्रह आहेत.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात पापग्रहांची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. एका राशीत दीर्घकाळ ठाण मांडून बसल्याने राशी चक्रावर परिणाम दिसून येतो. यात शनि, राहु-केतु हे महत्त्वाचे ग्रह ठरतात. हे ग्रह एकदा का राशीला आले की भल्याभल्यांना धक्का देऊन जातात. त्यामुळे या ग्रहांच्या स्थितीकडे ज्योतिष्यांचं लक्ष लागून असतं. राहु ग्रह गेल्या 17 महिन्यांपासून मेष राशीत आहे. आता पुढच्या महिन्यात म्हणजेच 30 ऑक्टोबरला राशी बदल करणार आहे. 30 ऑक्टोबरला राहु मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. दुपारी 2 वाजून 13 मिनिटांनी हा प्रवेश होईल. मीन राशीत राहु दीड वर्षे ठाण मांडून बसेल. त्यामुळे काही राशीच्या जातकांना शुभ फळ, तर काही राशीच्या जातकांना अशुभ फळं भोगावी लागू शकतात. त्यामुळे या कालावधीत राहुची स्थितीत खूपच महत्त्वाची ठरणार आहे.
या राशीच्या जातकांना होईल लाभ
मिथुन : राहु या राशीच्या दशम स्थानात गोचर करत असेल. त्यामुळे या राशीच्या जातकांना चांगलं फळं उपभोगता येणार आहेत. समाजात मानसन्मान वाढेल. तसेच करिअरमध्ये प्रगतीची नवी दारं खुली होतील. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या विरोधात होत असलेली षडयंत्रही धुळीस मिळतील. काल परवापर्यंत ज्या लोकांनी पाठ फिरवली ते लोकंही तुम्हाला साथ देतील. तुम्ही जे काम हाती घ्याल त नक्कीच पूर्ण कराल. हा काळ तुमच्या फलदायी असेल.
मकर : या राशीच्या तिसऱ्या स्थानात राहु असणार आहे. त्यामुळे या राशीच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झालेली दिसून येईल. व्यवसायात अपेक्षित फळ मिळेल. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणी तुमचं हुद्दा वाढलेला दिसून येईल. तुमच्या शब्दांना मान मिळेल. तसेच मोठी जबाबदारी तुमच्या हातून पार पडेल. त्यामुळे तुमचं कौतुक होईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं तुम्ही पूर्ण करू शकाल.
मीन : राहु ग्रह या राशीतच दीड वर्षासाठी ठाण मांडून बसणार आहे. हे घरं आत्मविश्वासाचं कारक आहे.त्यामुळे तुम्हाला त्याची चांगली फळं मिळतील. पण राहु हा मायावी असल्याने मोठी स्वप्न दाखवेल आणि हाती कमी पडेल अशी स्थिती राहील. पण काही न होऊ शकणारी कामं तुमच्याकडून होतील. त्यामुळे तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे सर्वा राहुच्या कृपेने झालेलं असेल. हे विसरू नका.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)