Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology 2023 : कर्क राशीत शुक्र आणि चंद्राची युती, सव्वा दोन दिवस तीन राशींना मिळणार साथ

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युती आघाड्यांमुळे बराच फरक पडत असतो. चंद्र कोणत्या ग्रहासोबत दीर्घकाळ युती करत नाही. त्यामुळे दर सव्वा दोन दिवसांनी राशीचक्रावर प्रभाव पडतो.

Astrology 2023 : कर्क राशीत शुक्र आणि चंद्राची युती, सव्वा दोन दिवस तीन राशींना मिळणार साथ
Astrology 2023 : चंद्र आणि शुक्राच्या युतीमुळे कर्क राशीत कलात्मक योग, सव्वा दोन दिवस तीन राशींसाठी फलदायी
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 3:34 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवस आणि एक सेकंदही जातकासाठी सारखा नसतो. ब्रह्मांडातील ग्रहांची स्थिती, नक्षत्र यांचा बराच प्रभाव जातकांवर पडत असतो. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. तर शुक्र हा भौतिक सुखांचा कारक मानला जातो. त्यात चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करत असतो. आता चंद्र आणि शुक्राची युती कर्क राशीत होणार आहे. यामुळे कलात्मक योग तयार होणार आहे. चंद्राने कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करताच हा योग संपुष्टात येईल. पण सव्वा दोन दिवस काही राशीच्या जातकांसाठी प्रभावी ठरणार आहे. चला जाणून घेऊयात हा योग कधी तयार होतो आणि त्याच्या कोणत्या राशींना फायदा होईल ते..

कधी तयार होत कलात्मक योग

14 ऑगस्टला चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत पहाटे 4 वाजून 25 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत शुक्र असल्याने कलात्मक योग जुळून येईल. 16 ऑगस्टला चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत संध्याकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी प्रवेश करेल.

या राशींच्या जातकांचं भलं होईल

मिथुन : शुक्र आणि चंद्राच्या युती या राशीच्या जातकांना फळ देणारी आहे. अडीच दिवसात काही सकारात्मक घडामोडी घडतील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्णत्वास येतील. तसेच समाजात मानसन्मान वाढेल. काही लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या ओळखीचा तुम्हाला फायदा होईल.

कर्क : याच राशीत शुक्र आणि चंद्राची युती होत आहे. त्यामुळे कलात्मक योगामुळे व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसून येईल. कुटुंबाची चांगली साथ मिळेल. त्याचबरोबर आर्थिक गणित सुटल्याने दिलासा मिळेल. कलाक्षेत्राशी निगडीत लोकांना हा काळ चांगला जाईल.

मकर : कलात्मक योग या राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणीतून सुटका मिळेल. जोडीदारासोबत जवळच्या एखाद्या ठिकाणी फिरण्याचा योग जुळून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना लाभ मिळू शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.