Astrology 2023: सूर्याने कर्क राशीत असतानाच केला आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, जाणून काय पडतो फरक

सूर्यदेवांना ग्रहांमध्ये राजाचा दर्जा देण्यात आला आहे. ग्रहांचा राजा सध्या कर्क राशीत असून आश्लेषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. नक्षत्र परिवर्तनामुळे काय फरक पडतो ते जाणून घ्या

Astrology 2023: सूर्याने कर्क राशीत असतानाच केला आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, जाणून काय पडतो फरक
सूर्यदेव
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 8:17 PM

मुंबई : सूर्यदेव एका राशीत महिनाभर ठाण मांडतो. त्यानंतर राशी बदल करतो. सूर्याच्या गोचराला संक्रांती म्हंटलं जातं. सध्या सूर्यदेव कर्क राशीत असून आश्लेषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्रात सूर्यदेव 17 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. त्यानंतर मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. आश्लेषा नक्षत्राचं स्वामित्व बुध ग्रहाकडे आहे. बुध आणि सूर्य यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध आहेत.सूर्यदेव या नक्षत्रातील चार चरणातून मघा नक्षत्रात प्रवेश करेल. आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या चरणाचं स्वामित्व गुरुकडे असून बुध, गुरु आणि चंद्रचा प्रभाव असतो. आश्लेषा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणाचे स्वामित्व शनिदेवांकडे असून यावर चंद्र,बुध आणि शनिचा प्रभाव आहे. आश्लेषा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणाचं स्वामित्वसु्द्धा शनिदेवांकडे असून चंद्र, बुध आणि शनिदेवांचा प्रभाव असतो. चौथ्या आणि शेवटच्या चरणाचं स्वामित्व गुरुकडे असून चंद्र, गुरु आणि बुधाचा प्रभाव आहे. त्यामुळे या टप्प्यात राशीचक्रावर परिणाम दिसून येईल.

या राशीच्या जातकांना मिळणार लाभ

मेष : या राशीच्या जातकांना आर्थिक लाभ मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत या काळात तयार होतील. हा महिना एकंदरीत चांगला जाईल असंच ग्रहमान आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची नवी शिखरं गाठाल.

मिथुन : या राशीच्या जातकांनाही आश्लेषा नक्षत्र प्रवेश शुभ ठरेल. आर्थिक स्थिती या काळात मजबूत होईल. पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होताना दिसेल.

सिंह : या राशीच्या जातकांनाही राशी परिवर्तन फलदायी ठरेल. थोड्याशा मेहनतीने चांगलं यश हाती पडेल. उत्पन्नात वाढ होईल. समाजात मान सन्मान वाढेल. लग्नासाठी इच्छुक असलेल्यांना स्थळं चालून येतील.

तूळ : सूर्याने आश्लेषा नक्षत्रात प्रवेश केल्याने या राशीच्या जातकांचं नशिब फळफळणार आहे. नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी ही योग्य वेळ ठरेल. यशाची नवी शिखरं या काळात गाठाल. घर किंवा वाहन खरेदीचा योग जुळून येईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.