Astrology 2023 : बुध गोचरामुळे तयार होणार लक्ष्मी नारायण योग, 67 दिवस या राशींना मिळेल कृपा प्रसाद
बुध ग्रहाच्या गोचराकडे ज्योतिषांचं लक्ष लागून आहे. बुधाच्या स्थितीमुळे पुढचे 67 दिवस चार राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळणार आहे. कोणत्या राशी आहेत ते जाणून घ्या..
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह अवघ्या तासांनंतर सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत बुध ग्रह 67 दिवसांपर्यंत राहणार आहे. सिंह राशीत शुक्र ग्रह ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे बुध ग्रहाच्या आगमनाने शुक्रासोबत युती होणार आहे. बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. बुध ग्रह बुद्धि आणि शिक्षणाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे बुध ग्रहाची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. बुध ग्रह सिंह राशीत 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे चार राशीच्या जातकांनावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. कोणत्या राशींना लाभ मिळणार ते जाणून घेऊयात
या राशीच्या जातकांना होईल फायदा
मिथुन : या राशीचं स्वामित्व बुध ग्रहाकडे आहे. त्यामुळे या काळात या राशीच्या जातकांचं आरोग्य एकदम मस्त असणार आहे. या काळात फिरायला जाण्याचा योग जुळून येईल. जवळच्या प्रेक्षणीय ठिकाणी जाण्याचा प्लान आखाल. नवीन लोकांशी ओळखी होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल. नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. चित्रपटसृष्टी आणि मीडियात काम करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल.
तूळ : या राशीच्या जातकांना बुध ग्रहाचं गोचर फलदायी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना अपेक्षित फळ मिळेल. कमी मेहनतीतच हाती यश मिळेल. झटपट पैसे कमवण्याच्या नादात काही चूक हातून घडणार नाही याची काळजी घ्या. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच या काळात केलेली गुंतवणूक फळास येईल.कला आणि सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत लोकांना लाभ मिळेल.
वृश्चिक : बुध गोचरामुळे कार्यक्षेत्रावर प्रभाव दिसून येईल. कामाच्या ठिकाणी वेग कमी असला तरी काम परफेक्ट होईल. जीवनात काही बदल अनपेक्षितपणे घडतील. जॉब प्रोफाईलमध्ये काही बदल होतील. एखाद्या चांगल्या कंपनीकडून ऑफर मिळू शकते.पॅकेज ठरवताना काळजी घ्या. हातात किती रक्कम पडणार याचा अंदाज घ्या. पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्या.
धनु : ग्रहमान या राशीच्या जातकांसाठी अनुकूल असणार आहे. 67 दिवसात परदेश दौऱ्यावर जाण्याची वेळ येऊ शकते. प्रवासात काही कामंही झटपट पूर्ण होतील. बॉसकडून चांगलं सहकार्य मिळेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचं उत्तम फळ मिळेल. पार्टनरशिपचा धंदा करणाऱ्या जातकांना चांगलं उत्पन्न मिळेल. या काळात प्रॉपर्टी किंवा जमिनीत गुंतवणूक करू शकता.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)