Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology 2023 : एप्रिल महिन्यात ग्रहाच्या अशा गोचरामुळे ‘विनाशकारी’ योगाची स्थिती, या राशींच्या अडचणीत होणार वाढ

एप्रिल महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. बरेच मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. मेष राशीत राहु आणि गुरुच्या युतीमुळे गुरु चांडाळ योग तयार होत आहे.

Astrology 2023 : एप्रिल महिन्यात ग्रहाच्या अशा गोचरामुळे 'विनाशकारी' योगाची स्थिती, या राशींच्या अडचणीत होणार वाढ
Astrology 2023 : एप्रिल महिन्यात जरा सांभाळूनच, ग्रहांचं गोचर आणि अशुभ युतींचा बसणार चार राशींना फटका Image Credit source: फाईल फोटो
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 12:45 PM

मुंबई – एप्रिल महिना ग्रहांच्या गोचराच्या दृष्टीकोनातून खूपच महत्त्वाचा आहे. शुक्र, सूर्य, बुध आणि गुरु ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे काही शुभ अशुभ योगाची स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशीच्या जातकांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. 14 एप्रिल 2023 रोजी सूर्यदेव दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करतील. त्यानंतर 21 एप्रिलला बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. गुरु ग्रहही 22 एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यात मेष राशीत राहु ठाण मांडून बसल्याने काही अशुभ योग तयार होणार आहेत.

मेष राशीत राहु आणि गुरुच्या युतीमुळे चांडाळ योग तयार होणार आहे. हा योग ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर सूर्य आणि राहुच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होत आहे. हा योग महिनाभर असणार आहे. त्यामुळे या काळात काही जातकांवर विपरीत परिणाम दिसून येतील. त्यामुळे या काळात काळजी घेणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊयात चार राशींबाबत…

सिंह – या राशीच्या जातकांना एप्रिल महिना तणावपूर्ण जाईल अशी ग्रहांची स्थिती आहे. त्यामुळे शत्रूपक्ष तुमच्यावर हावी होऊ शकतो. आर्थिक स्थितीही या काळात अस्थिर असेल. त्यात वारेमाप खर्चामुळे डोकेदुखी वाढेल.त्यामुळे पैशांची चणचण या काळात भासेल. धंद्याकडे व्यवस्थित लक्ष केंद्रीत करा. तसेच गुंतवणूक करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. नाहीतर भविष्यात फटका बसू शकतो.

तूळ – या राशीची नुकतीच शनिच्या अडीचकीतून सुटका झाली आहे. पण एप्रिल महिन्यातील ग्रहांची स्थिती काही अनुकूल नाही. त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. कुटुंबात काही कारणावरून वाद होऊ शकतात. वैवाहित जीवनात कलह निर्माण होऊ शकतात. त्यामुळे विनाकारण वाद करणं टाळा. शब्दाने शब्द वाढतो त्यामुळे जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहा.

वृश्चिक – या राशीला सध्या शनिची अडीचकी सुरु आहे. त्यात एप्रिल महिन्यातील ग्रहमान अनुकूल नाही. व्यवसायिक जीवनात काही त्रास सहन करावे लागतील. कामाच्या ठिकाणी विनाकारण काही वाद होतील. दुसरीकडे पैशांचा व्यवहार करताना विचारपूर्वक करा. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

धनु – या राशीची साडेसातीतून सुटका झाली आहे. मात्र ग्रहमान बाजूने नसल्याने त्रासदायक गोष्टी घडतील. नोकरीसाठी वणवण फिरण्याची वेळ येईल. तसेच आरोग्यविषयक तक्रारींनी ग्रासून जाल. कुटुंबात आर्थिक स्थैर्य नसल्याने वाद होतील. त्यामुळे शांत आणि दैवी उपासना करण्यात जास्तीत जास्त वेळ खर्ची करा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अधिक मेहनत घ्यावी लागेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...