Astrology 2024 : 12 वर्षानंतर मंगळ आणि गुरुची युती, या राशींना मिळणार ग्रहांचं पाठबळ

ज्योतिषशास्त्रात एखाद्या ग्रहाने राशीबदल केला की उलथापालथ होते. ज्योतिषशास्त्रानुसार काही चांगले काही वाईट परिणाम भोगावे लागतात. असाच एक दुर्मिळ योग 12 वर्षानंतर जुळून आला आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत

Astrology 2024 : 12 वर्षानंतर मंगळ आणि गुरुची युती, या राशींना मिळणार ग्रहांचं पाठबळ
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 9:30 PM

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशीबदल करत असतो. ग्रहांचं 12 राशीत भ्रमण होत असतं. काही ग्रहांचा राशी बदलाचा कालावधी हा कमी असतो. तर शनि, राहु-केतुसारखे ग्रह एखाद्या राशीत दीर्घकाळ राहतात. या स्थितीमुळे राशीचक्रावर परिणाम होते. राहु आणि केतु यांची युती वगळता सर्वच ग्रहांच्या युती आघाड्या होत असतात. त्याचा चांगला वाईट परिणाम राशीचक्रावर होतो. वर्षभरासाठी गुरु हा ग्रह वृषभ राशीत विराजमान आहे. आता गोचर कालावधीनुसार मंगळ हा ग्रह वृषभ राशीत आला आहे. त्यामुळे मंगळ आणि गुरुची युती झाली आहे. 12 वर्षानंतर वृषभ राशीत ही युती झाली आहे. या युतीमुळे काही राशींना पाठबळ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घ्या

या तीन राशींना होणार लाभ

मेष : या राशीच्या दुसऱ्या म्हणजेच धन आणि वाणी राशीत गुरु मंगळ ग्रहाची युती झाली आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना या स्थितीचा लाभ मिळणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच आपल्या वाणीचा प्रभाव इतरांवर पडेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. एक वेगळात आत्मविश्वास या कालावधीत तयार होईल.

मकर : या राशीच्या पंचम स्थानात गुरु आणि मंगळ ग्रह एकत्र येत आहेत. संतान आणि शिक्षणासंदर्भात चांगल्या बातम्या या काळात मिळतील. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन या कालावधीत मिळेल. आर्थिक स्थितीही या कालावधीत उत्तम राहील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे मिळू शकतात. वैवाहिक जीवन चांगलं राहील.

वृषभ : या राशीत म्हणजेच लग्न राशीत गुरु आणि मंगळाची युती होत आहे. त्यामुळे या युतीमुळे चेहऱ्यावरील तेज आणखी प्रभावीपणे दिसेल. आत्मविश्वास दुणावलेला राहील. आपली छाप प्रत्येक कामात पडेल. इच्छाशक्तीच्या जोरावर किचकट कामं पूर्ण कराल. लग्न झालेल्या जातकांना जोडीदाराकडून उत्तम साथ लाभेल. भौतिक सुख या काळात अनुभवता येईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.