एका वर्षानंतर शुक्र ग्रह करणार स्वराशीत प्रवेश, या राशींसाठी सुरु होणार सुवर्णकाळ
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशीबदल करत असतो. शुक्र ग्रह आता स्वरास असलेल्या तुला राशीत मार्गक्रमण करणार आहे. त्यामुळे काही राशींना शुक्राचं बळ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत.
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाचं महत्त्व काही वेगळंच आहे. भौतिक सुख आणि वैवाहिक जीवनाचा कारक म्हणून या ग्रहाकडे पाहिलं जातं. त्यामुळे ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह बलवान त्याला भौतिक सुखांची काहीच कमी राहात नाही. त्यामुळे ज्योतिष कुंडली बघताना शुक्राची स्थिती पाहतात. त्यावरून भविष्याचा आणि भौतिक सुखांचा वेध घेतात. अशाच शुक्र ग्रहाची ग्रहमंडळातील स्थिती येत्या काही दिवसात बदलणार आहे. वर्षाभरानंतर शुक्र ग्रह पुन्हा एकदा स्वराशीत येणार आहे. तूळ ही शुक्राची स्वरास आहे. तूळ राशीचं स्वामी ग्रह हा शुक्र आहे. त्यामुळे या राशीत प्रवेश करताच काही राशींना लाभ मिळणार आहे. खासकरून तीन राशीच्या जातकांना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या त्या..
मकर : या राशीच्या जातकांना साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. त्यामुळे जीवन अस्थिर झाल्याचं पाहायला मिळत आहे. असताना शुक्राची साथ थोड्यासाठी दिलासा देणारी आहे. या कालावधीत कामात प्रगती होताना दिसेल. तसेच करिअरमध्ये काही प्रगतीचे योग जुळून येतील. व्यवसायिकांना धनलाभ होऊ शकतो. तसेच कौटुंबिक कलह या काळात शांत होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो.
तूळ : शुक्र ग्रह याच राशीत विराजमान होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना दिलासा मिळेल. आत्मविश्वास या कालावधीत वाढेल. कारण स्वामी ग्रह आणि प्रथम स्थानात असल्याने व्यक्तिमत्व सुधारेल. उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत या कालावधीत तयार होतील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामंही मार्गी लागतील. नातेवाईकांसोबत काही आनंदाचे क्षण घालवता येतील.
मेष : या राशीच्या जातकांना शुक्र ग्रह फायद्याचा ठरणार आहे. कारण सप्तम भावात शुक्र ग्रह असणार आहे. त्यामुळे बायकोची उत्तम साथ या कालावधीत मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना हा काळ चांगला जाईल. भागीदारीच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल. लग्नासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी काही स्थळं चालून येतील. कौटुंबिक स्तरावर लग्नासाठी जोरदार प्रयत्न होतील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)