30 वर्षानंतर कुंभ राशीत बुध-शनिची युती, 16 दिवस कौटुंबिक पातळीवर या राशींचा ताप वाढणार
ज्योतिषशास्त्रात दिवसागणिक बऱ्याच घडामोडी घडत असतात. त्यामुळे त्याच्या मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम होत असतो. ज्योतिषीय गणित बऱ्याच घडामोडींचं आकलनं करत असतं. असं असताना बुध आणि शनि 30 वर्षानंतर कुंभ राशीत एकत्र येत आहेत. यामुळे तीन राशींना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रानंतर बुध ग्रहाचा गोचर कालावधी हा सर्वाधिक आहे. एका राशीत जास्त काळ न थांबता बुध ग्रह पुढच्या मार्गाला लागतो. शनिचा गोचर कालावधी हा अडीच वर्षांचा आहे. त्यामुळे एका राशीत 12 राशी फिरून येण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागतो. गेल्यावर्षी शनिदेव स्वरास असलेल्या कुंभमध्ये विराजमान आहेत. त्यानंतर कुंभेत बुध ग्रहाचं गोचर होणार आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजून 23 मिनिटांनी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर लगेचच 20 दिवसांनी म्हणजेच 20 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजून 1 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीत बुध ग्रह 16 दिवस राहणार आहे. या 16 दिवसांच्या कालावधीत तीन राशींच्या जातकांना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण यामुळे कौटुंबिक पातळीवर वाद होण्याची शक्यता आहे. पत्नीसोबत भांडण होऊ शकतं. त्यामुळे काळदी घेणं गरजेचं आहे.
या तीन राशींना होणार त्रास
धनु : या राशीच्या तृतीय स्थानात म्हणजे भावकीच्या स्थानात बुध आणि शनिची युती होत आहे. बुध आणि शनिच्या युतीमुळे या राशीच्या जातकांना त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. जमिनीचा वाद उफाळून येईल. काही प्रकरणात न्यायालय किंवा पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागू शकते. त्यामुळे वाद जितका सामंजस्यपणे सुटेल तितकं बरं होईल. कारण या वादामुळे मानसिक त्रास वाढतच जाईल. काही गोष्टी असह्यदेखील होतील.
वृश्चिक : शनिची अडीचकी सुरु असताना चतुर्थ स्थानात बुधाची युती होत आहे. 16 दिवसांच्या कालावधीत सासू सूनेचा वाद टोकाला जाईल. आईकडून वारंवार टोमणे आणि माहेरच्यांच्या अपमानाला सामोरं जावं लागेल. लग्नातील उणीधुणी काढून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळ या कालावधीत शांत राहणं चांगलं राहील. वादाने वाद वाढते हे लक्षात ठेवा.
कन्या : शत्रू स्थानात बुध आणि शनिची युती होत आहे. त्यामुळे काही गोष्टींमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. होणाऱ्या कामांमध्ये वारंवार अडथळा आणला जाईल. त्यामुळे काळजी घ्या. मोठे आर्थिक व्यवहार या कालावधीत करू नका. विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)