Astrology : फेब्रुवारी महिन्यात चार ग्रहांच्या स्थितीत होणार बदल, राशीचक्रावर असा होणार परिणाम
2024 या वर्षाचा पहिला महिना संपला असून आता वेध लागलेत ते फेब्रुवारी महिन्याचे..या महिन्यात ग्रहांच्या स्थितीकडे जातकांचं लक्ष लागून आहे. कोणत्या ग्रह कोणत्या राशीत विराजमना इथपासून त्याची फलश्रूती काय आहे याचा अंदाज बांधला जात आहे.
मुंबई : फेब्रुवारी महिना कसा असेल? कोणता ग्रह कशी साथ देईल? इथपासून सर्व तर्कवितर्क लावले जात आहेत. या महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य हे ग्रह राशी बदल करणार आहेत. तर शनि, राहु-केतु आणि गुरु हे ग्रह आहे त्या राशीतच राहतील. तर चंद्र ग्रह ठरल्याप्रमाणे दर सव्वा दोन दिवसांनी राशीबदल करणार आहे. 1 फेब्रुवारीला बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करेल. 8 फेब्रुवारीला बुध ग्रह मकर राशीत अस्ताला जाईल. त्यानंतर 20 फेब्रुवारीला मकर राशीतून कुंभ राशीत जाईल. असा दोन वेळा राशीबदल करेल. 5 फेब्रुवारीला मंगळ ग्रह मकर राशीत प्रवेश करेल. 12 फेब्रुवारीला शु्क्र मकर राशीत गोचर करेल. त्यानंतर 13 फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. इतकी सर्व उलथापालथ होत असल्याने शुभ अशुभ योग तयार होतील. खासकरून तीन राशींच्या जातकांना या स्थितीचा लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या त्या
मेष : या राशीच्या जातकांना फेब्रुवारी महिना जबरदस्त लाभदायी असेल. ग्रहांची उत्तम साथ या काळात मिळेल. आदित्य मंगळ आणि बुधादित्य योगामुळे चांगली फळं मिळतील. नोकरी आणि व्यवसायात फायदा होऊ शकतो. समाजात मानसन्मान वाढेल. राजकारणाशी निगडीत लोकांना लाभ मिळू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. अचानकपणे धनलाभ होऊ शकतो.
वृषभ : या राशीच्या जातकांनाही फेब्रुवारी महिन्यात सकारात्मक बदल दिसून येईल. शिक्षणाच्या बाबतीत हा महिना सर्वाधिक लाभ देईल. विदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना संधी मिळेल. आर्थिक स्थिती आधीपेक्षा सुधारलेली राहील. देवदर्शनाला जाण्याचा योग जुळून येईल. धार्मिक आणि मंगळकार्यात सहभागी होऊ शकता. काही अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कर्क : फेब्रुवारी महिन्यात एका पाठोपाठ एक अशी किचकट कामं पूर्ण होतील. नोकरी आणि करिअरमध्ये एक वेगळी उंची गाठाल. जमिनीशी निगडीत व्यवहारामध्ये चांगला लाभ मिळू शकतो. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण राहील. पत्नीसोबत चांगले संबंध प्रस्तापित होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)