Astrology 2024 : डिसेंबर महिन्यात शुक्र आणि मंगळ येणार आमनेसामने, या राशींना मिळणार लाभ
दैत्यगुरू शुक्र आणि मंगळ हे दोन्ही ग्रह डिसेंबर महिन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे समसप्तक राजयोग तयार होणार आहे. या योगामुळे तीन राशींचं नशिब चमकणार आहे.
नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात ग्रहांची स्थिती कशी असेल याकडे जातकांचं लक्ष लागून आहे. डिसेंबर महिन्यात ग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा असलेला मंगळ ग्रह कर्क राशीत विराजमान असणार आहे. तर दैत्यगुरू आणि भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र दोन वेळा गोचर करणार आहे. जेव्हा शुक्र ग्रह शनिच्या मकर राशीत विराजमान होईल तेव्हा समसप्तक योग तयार होणार आहे. हा एक राजयोग असून यामुळे राशीचक्रावर सकारात्मक बदल दिसून येईल. समसप्तक म्हणजे ग्रहमंडळात हे दोन्ही ग्रह 180 डिग्रीवर एकमेकांसमोर असणार आहेत. द्रिक पंचांगानुसार शुक्र ग्रह 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजून 46 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. या राशीत 28 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. तर मंगळ ग्रह कर्क राशीतच असणार आहे. त्यामुळे 26 दिवस या योगाचा लाभ काही राशींना मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या राशींबाबत
या राशीच्या जातकांना होणार लाभ
मेष : या राशीच्या दहाव्या स्थानात शुक्र आणि चौथ्या स्थानात मंगळ ग्रह असणार आहे. त्यामुळे 26 दिवसांच्या कालावधीत अडचणींवर सहज मात करता येईल. तसेच वाणी स्थानात बसलेल्या गुरुची उत्तम साथ लाभेल. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. तसेच हाती घेतलेली कामं झटपट पूर्ण होतील. नोकरी व्यवसायात चांगलं यश मिळेल. पैशांची बचत करण्यात यश मिळेल.
कन्या : या राशीच्या अकराव्या स्थानात मंगळ आणि पाचव्या स्थानात शुक्र असणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना उद्योगधंद्यातून अपेक्षित मिळकत मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. पगारवाढीची शक्यता या कालावधीत आहे. गुंतवणुकीसाठी उत्तम काळ असणार आहे. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा.
मकर : या राशीच्या लग्न भावात शुक्र आणि सातव्या स्थानात मंगळ असणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना करिअरमध्ये मोठी झेप घेता येईल. कामानिमित्त लांबचा प्रवास करण्याच योग जुळून येईल. व्यवसायात मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो. पैसा खर्च करताना काळजी घेणं आवश्यक आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)