Astrology 2024 : मंगळ शुक्राच्या युतीमुळे 24 दिवसांसाठी धनशक्ति योग, या राशींसाठी ग्रहांची अनुकूल परिस्थिती

राजकारणाप्रमाणे ग्रहांच्या युती आघाड्या या ग्रहमंडळात होत असतात. युती आघाड्यांमुळे राशीचक्रावर परिणाम होत असतात. काही युती चांगला, तर काही आघाड्यांचा विपरीत परिणाम होतो. फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत मंगळ आणि शुक्र युती होत आहे. त्यामुळे राशीचक्रातील काही राशींना लाभ मिळेल.

Astrology 2024 : मंगळ शुक्राच्या युतीमुळे 24 दिवसांसाठी धनशक्ति योग, या राशींसाठी ग्रहांची अनुकूल परिस्थिती
Astrology 2024 : मंगळ शुक्राच्या युतीने 24 दिवस सकारात्मक प्रभाव पडणार, या राशींना मिळणार उत्तम साथ
Follow us
| Updated on: Jan 26, 2024 | 4:13 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्थिती महत्त्वाची असते. ग्रहांचा गोचर कालावधी वेगवेगळा असल्याने एकाच राशीत कधी कधी एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे राशीचक्रात मोठी उलथापालथ होते. जानेवारी महिना संपायला आता काही अवधी शिल्लक असून फेब्रुवारीत ग्रह गोचर करणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत मंगळ आणि शुक्र ग्रहाची युती होत आहे. 5 फेब्रुवारीला मंगळ ग्रह धनु राशीतून मकर राशीत रात्री 9 वाजून 43 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत 15 मार्चपर्यंत असेल. दुसरीकडे, शुक्र ग्रह धनु राशीतून मकर राशीत 12 फेब्रुवारीला प्रवेश करेल आणि 7 मार्चपर्यंत राहील. 24 दिवस मकर राशीत मंगळ शुक्राची युती होईल. 24 दिवसांसाठी मकर राशीत धनशक्ति योग तयार होईल. त्याचा लाभ काही राशींना मिळेल. कोणत्या राशींना लाभ मिळणार ते जाणून घ्या

मेष : या राशीच्या दशम स्थानात शुक्र मंगळाच्या युतीमुळे धनशक्ति योग तयार होत आहे. या योगामुळे जातकांना मानसन्मान मिळेल. तसेच करिअरमध्ये अपेक्षित उंची गाठाल. या कालावधीत आर्थिक स्थिती मजबूत होईल. उद्योग व्यवसायात ठरवल्याप्रमाणे फायदा होईल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील.

वृषभ : या राशीच्या नवम स्थानान मंगळ शुक्राची युती होत आहे. त्यामुळे करिअरमध्ये प्रगती होताना दिसून येईल. गेल्या काही दिवसांपासून ठरवलेलं लक्ष्य गाठाल. सध्या इन्क्रिमेंटचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यात या ग्रहांची उत्तम साथ मिळेल. आपले विचार प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करा. अपेक्षित यश हाती लागेल. अनेक वर्षांपासून सुरू असलेली भांडणं संपुष्टात येतील.

कन्या : या राशीच्या पंचम स्थानात मंगळ शुक्राची युती होत आहे. त्यामुळे हा काळ अनुकूल असेल. शुक्रामुळे भौतिक सुखांची प्राप्ती होईल. घर किंवा वाहन खरेदीची योग जुळून येईलल. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा खूपच सुधारलेली दिसून येईल. त्यामुळे नातेवाईकही घरी ये जा करताना दिसतील. पैशांचा योग्य उपयोग करा. गुंतवणूक करा, जेणेकरून भविष्यात त्याचा अधिक लाभ मिळेल. मुलांसोबत वेळ व्यतित करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.