Astrology 2024 : 15 नोव्हेंबरपासून कुंभ राशीत शनिदेव करणार चाल! या राशींनी जरा जपूनच
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचा एक गोचर कालावधी ठरलेला असतो. त्यामुळे त्या ग्रहाच्या स्थितीत बदल झाली की राशीचक्रावर परिणाम होतो. शनि हा ग्रह मंद गतीने प्रवास करतो. त्यामुळे या ग्रहाचं काही झालं तर त्याचा मोठा फरक राशीचक्रावर दिसून येतो. 15 नोव्हेंबरपासून अशीच काहीशी स्थिती आहे.
शनिदेवांचा मकर राशीतील साडे सात वर्षांचा काळ लवकरच संपणार आहे. पुढच्या वर्षात शनिदेव मार्गस्थ होणार आहेत आणि मेष राशीत सुरुवात करणार आहे. सध्या शनिदेव हे कुंभ राशीत विराजमान आहेत. त्यामुळे मकर राशीच्या शेवटचा, कुंभ राशीला मधला आणि मीन राशीला शेवटचा टप्पा सुरु आहे. शनिदेव कुंभ राशीत असून त्यांची स्वरास आहे. असं असताना शनिदेव 15 नोव्हेंबरपासून मार्गस्थ होणार आहे. न्यायदेवता या राशीत मार्गस्थ होणार तर त्याचा परिणाम राशीचक्रात होणार यात शंकाच नाही. पण राशींवर या स्थितीचा खूप वाईट प्रभाव पड़ू शकतो. त्यामुळे या कालावाधीत जरा सावधपणे राहणं गरजेचं आहे. नकारात्मक प्रभावापासून दूर राहणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात शनिदेव कोणत्या राशींवर नकारात्मक प्रभाव टाकणार ते..
या राशींवर असेल शनिची वक्रदृष्टी
तूळ : शनिदेव कुंभ राशीत मार्गस्थ होताच या राशीच्या जातकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे 15 नोव्हेंबरनंतर या राशीच्या जातकांनी जरा सांभाळूनच राहावं. काही कामात अडचणीही येऊ शकतात. त्यामुळे आपल्या योजना कोणापुढे सांगू नका. अन्यथा त्याचा फटका बसू शकतो. वाद होईल असं अजिबात वागू नका. त्यामुळे पुढचे अडीच महिने सांभाळून राहणं गरजेचं आहे.
धनु : या राशीच्या जातकांना 15 नोव्हेंबर नंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वायफळ खर्च करणं टाळलं तर बरंहोईल. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. वैवाहिक जीवनात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मीन : या राशीच्या जातकांना साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना हा काळ अडचणींचा जाईल. त्यामुळे आर्थिक स्थिती सांभाळा आणि आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतात. साडेसाती सुरु आहे हे विसरू नका. केलेल्या चुकांची थेट माफी मागणं फायदेशीर राहील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)