Astrology 2024 : जानेवारी महिन्यात ग्रहांची अशी स्थिती, शुभ अशुभ योगांचा राशीचक्रावर होणार परिणाम

नववर्ष 2024 सुरु झालं आहे. प्रत्येकांना नववर्षात काही ना काही संकल्प केला असेलच. पण ग्रहांची तितकी साथ आपल्याला मिळणार का? प्रत्येक महिन्यात ग्रहांचं गणित कसं असेल याबाबत जातकांना चिंता लागून असेल. ग्रहमान आपल्यासाठी अनुकूल असावं अशीच सर्वांची इच्छा आहे. चला जाणून घेऊयात जानेवारी 2024 या महिन्यात कोणते ग्रह गोचर करणार आणि शुभ अशुभ योग जुळून येणार ते..

Astrology 2024 : जानेवारी महिन्यात ग्रहांची अशी स्थिती, शुभ अशुभ योगांचा राशीचक्रावर होणार परिणाम
Astrology 2024 : जानेवारी महिन्यात बुध, शुक्र आणि सूर्याच्या स्थितीत बदल, राशीचक्रावर असा पडणार प्रभाव
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 4:48 PM

मुंबई : नववर्ष 2024 मधील जानेवारी महिना ग्रहांच्या दृष्टीने कसा जाईल यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. कोणता ग्रह कोणत्या स्थानात बसला आहे आणि कसं फळ देईल याबाबत गणित मांडलं जात आहे. जानेवारी महिन्यात गुरु, शनि, राहु-केतु आणि मंगळ हे ग्रह काही राशी बदल करणार नाहीत. त्यामुळे आता ज्या राशीत विराजमान आहेत. त्याच राशीत ठाण मांडून बसणार आहे. पण इतर ग्रहांच्या सान्निध्यात आल्याने शुभ अशुभ योगाची स्थिती निर्माण होणार आहे. या महिन्यात सूर्य एकदा, बुध एकदा, शुक्र एकदा, तर चंद्र 13 वेळा राशी बदल करणार आहे. त्यामुळे राशीचक्रावर त्या त्या ग्रहाच्या गोचरानंतर परिणाम दिसून येईल. चंद्राची स्थिती दर सव्वा दोन दिवसांनी बदलत राहणार आहे. त्यानंतर बुध ग्रहाच्या स्थितीत बदल होणार आहे.

बुध गोचर

बुध ग्रह 7 जानेवारीला वृश्चिक मधून धनु राशीत प्रवेश करेल. रात्री 9 वाजून 16 मिनिटांनी हा प्रवेश असेल. 1 फेब्रुवारीपर्यंत यात राशीत राहील. याच दिवशी दुपारी 2 वाजून 23 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल.

सूर्य गोचर

15 जानेवारी सूर्य ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. पहाटे 2 वाजून 43 मिनिटांनी हा बदल होईल.

शुक्र गोचर

शुक्र ग्रह सध्या वृश्चिक राशीत आहे. 18 जानेवारी 2024 रोजी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. रात्री 8.56 मिनिटांनी हा प्रवेश होईल. 12 फेब्रुवारीपर्यंत शुक्र या राशीत विराजमान राहील.

गुरु, शनि, राहु-केतु गोचर

गुरु, शनि, राहु आणि केतु या ग्रहांचं गोचर या वर्षात नाही. शनिदेव सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. शनिच्या स्थितीत काळानुरूप बदल होत राहतील. 2025 वर्षात शनिदेव मीन राशीत प्रवेश करतील. राहु ग्रह मीन राशीत असून दीड वर्ष याच राशीत असणार आहे. केतु ग्रह कन्या राशीत असून याच राशीत दीड वर्षे असणार आहे. गुरु ग्रह मे 2024 पर्यंत मेष राशीत असणार आहे.

चंद्र गोचर

चंद्र जानेवारी महिन्यात 13 वेळा राशीबदल करणार आहे. चंद्राच्या गोचरासोबत शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होईल. वर्षाच्या सुरुवातीला चंद्र सिंह राशीत होता.

  • 2 जानेवारी सिंह राशीतून कन्या राशीत येईल. केतुशी युती झाल्यामुळे ग्रहण योग लागेल.
  • 5 जानेवारीला कन्या राशीतून तूळ राशीत येईल. कोणताही ग्रह नसल्याने शुभ अशुभ योग नाही.
  • 7 जानेवारीला तूळ राशीतून वृश्चिक राशीत येईल. या राशीत शुक्राशी जवळीक साधल्याने कलात्मक योग जुळून येईल.
  • 9 जानेवारीला वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. या राशीत मंगळ आणि सूर्यासोबत युती होईल. त्रिग्रही योग जुळून येईल. मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे सव्वा दोन दिवस लक्ष्मी योग असेल. चंद्र आणि सूर्याच्या युतीमुळे नकारात्मक प्रभाव पडे. तर मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे आदित्य मंगळ योग असेल.
  • 11 जानेवारीला धनु राशीतून मकर राशीत, चंद्र आणि बुधाची युती होईल. त्यामुळे बुध राजयोग तयार होणार आहे.
  • 13 जानेवारीला मकर राशीतून कुंभ राशीत युती येईल. शनिच्या सान्निध्यात आल्याने विष योग तयार होईल.
  • 16 जानेवारीला कुंभ राशीतून मीन राशीत युती येईल. राहुच्या सान्निध्यात आल्याने ग्रहण योग असेल.
  • 18 जानेवारीला मीन राशीतून मेष राशीत युती येईल. गुरुच्या सान्निध्यात आल्याने गजकेसरी योग तयार होईल.
  • 20 जानेवारीला मेष राशीतून वृषभ राशीत युती येईल. या राशीत कोणताही ग्रह नसल्याने शुभ अशुभ योगाची स्थिती नाही.
  • 22 जानेवारीला वृषभ राशीतून मिथुन राशीत युती येईल. या राशीत कोणताही ग्रह नसल्याने शुभ अशुभ योगाची स्थिती नाही.
  • 25 जानेवारीला मिथुन राशीतून कर्क राशीत येईल. या राशीत कोणताही ग्रह नसल्याने शुभ अशुभ योगाची स्थिती नाही.
  • 27 जानेवारीला कर्क राशीतून सिंह राशीत येईल. या राशीत कोणताही ग्रह नसल्याने शुभ अशुभ योगाची स्थिती नाही.
  • 30 जानेवारीला सिंह राशीतून कन्या राशीत, चंद्र आणि केतुच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.