1 वर्षानंतर शुक्र मित्र राशी असलेल्या मेषमध्ये करणार प्रवेश, या राशींना मिळणार लाभ
भौतिक सुखांचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाच्या स्थितीकडे साऱ्यांचं लक्ष लागून असतं. कारण या ग्रहाच्या चांगल्या स्थितीमुळे आयुष्यात महत्त्वाचे बदल होतात. धन, वैभव, ऐश्वर्य, प्रेम, लग्झरी आणि भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह लवकरच राशी बदल करणार आहे.

ज्योतिषशास्त्रात शुक्राच्या स्थितीकडे बारकाईने लक्ष दिलं जातं. कारण शुक्रामुळे मानवाचं जीवन सुकर होतं. म्हणजेच भौतिक सुख अनुभवता येतं. शुक्र हा धन, वैभव, ऐश्वर्य, लक्झरी, प्रेम आणि भौतिक सुखांचा कारण असलेला ग्रह आहे. शुक्राची चाल बदलली की आयुष्यात फरक दिसून येतो. त्यामुळे शुक्राच्या स्थितीवर बरंच काही अवलंबून असतं. लवकरच शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. 31 मे रोजी शुक्र ग्रह मीन राशीतून मेष राशीत गोचर करणार आहे. 28 जूनपर्यंत या राशीत राहील. त्यानंतर 29 जूनला वृषभ राशीत प्रवेश करेल. म्हणजेच मेष राशीत जवळपास 28 दिवस राहणार आहे. शुक्र ग्रहाने गोचर केल्यानंतर सर्वच राशींवर प्रभाव पडणार आहे. मात्र काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत
या तीन राशींना मिळणार लाभ
मीन : शुक्राने मेष राशीच गोचर करताच द्वितीय स्थानात येणार आहे. कुंडलीतील दुसरं स्थान हे धन आणि वाणीचं कारक आहे. यामुळे जातकाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच आपण ज्या गोष्टी सांगू त्याच अमलात आणल्या जातील. एकंदरीत 29 दिवसांचा कालावधीत बरंच काही सकारात्मक घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत डोकं शांत ठेवून आपली कामं पूर्ण करा.
कर्क : या राशीच्या दशम स्थानात शुक्र गोचर करणार आहे. हे स्थान व्यवसाय आणि नोकरीशी निगडीत आहे. या कालावधीत पगारवाढ किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडून सहकार्य मिळेल. फिल्म लाईन किंवा कलेशी निगडीत क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल. व्यवसाय करणाऱ्या जातकांना या कालावधीत मोठ्या ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत धनलाभाचा योग आहे.
सिंह : या राशीच्या नवव्या स्थानात शुक्र ग्रह गोचर करणार आठहे. या स्थानाला भाग्य स्थान म्हंटलं जातं. नशिबाची पूर्ण साथ या कालावधीत मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल. तसेच ठरवलेली कामात यश मिळेल. इतकंच काय तर किचकट कामही चुटकीसरशी पूर्ण होतील. तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण असेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)