Astrology 2025 : फक्त 32 दिवस आणि गुरु ग्रहाची दिशा बदलणार भाग्य, या राशी ठरणार भाग्यवान
नववर्ष 2025 सुरु झालं असून या वर्षात आपल्याला ग्रहांची कशी साथ मिळेल याकडे जातकांचं लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे गुरूबळ पाठीशी असेल तर अडकलेली कामंही पूर्ण होतात. गुरूची स्थिती पुढच्या 32 दिवसात बदलणार आहे. तसेच या स्थितीचा तीन राशींना लाभ मिळणार आहे.
राशीचक्रातील सर्वात मोठा ग्रह म्हणून गुरु ग्रहाची ख्याती आहे. एखाद्या व्यक्तीच्या पाठी गुरूची शक्ती असेल तर मग मागेपुढे पाहण्याची गरजच नाही. त्यामुळे गुरु ग्रहाची स्थिती नववर्षात कशी आहे. आपल्या राशीला गुरु बळ देणार का? असे प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. गुरु ग्रह दर 13 महिन्यांनी राशीबदल करतो. पण गुरुची वक्री आणि मार्गस्थ स्थितीही खूप महत्त्वाची ठरते. सध्या गुरु ग्रह हा वृषभ राशीत असून वक्री आहे. या स्थितीत 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी बदल होणार आहे. म्हणजेच याच राशीत गुरु ग्रह हा मार्गस्थ होणार आहे. गुरु ग्रह या राशीत 119 दिवस वक्री स्थितीत असणार याचं आकलन आधीच केलं गेलं होतं. पण आता मार्गस्थ होणार असल्याने तीन राशीच्या जातकांना त्याचा लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना बळ मिळणार ते..
या राशींना मिळणार बळ
मेष : या राशीच्या जातकांना गुरुची स्थिती बदलणं लाभदायक ठरणार आहे. कारण दुसऱ्या स्थानात गुरु असून हे धन स्थान आहे. या स्थानात गुरु मार्गस्थ होणं फायद्याचं आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी यामुळे दूर होतील. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे.नोकरी करणाऱ्या जातकांना सकारात्मक परिणाम दिसून येतील. मागच्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यात आता सुधारणा होताना दिसेल.
कन्या : या राशीच्या नवव्या स्थानात गुरु ग्रह मार्गस्थ होणार आहे. करिअरशी निगडीत असलेल्या स्थानात गुरु मार्गी होणार म्हंटलं की भरभराट होणार आहे. करिअरमध्ये नवी उंची गाठण्याची संधी मिळेल. व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकतं. लव्हलाईफ चांगलं राहील. कौटुंबिक वादातून दिलासा मिळू शकतो. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील.
वृश्चिक : या राशीच्या पाचव्या स्थानाचा गुरु स्वामी असून सातव्या स्थानात मार्गस्थ होणार आहे. यामुळे या राशीच्या जातकांना कौटुंबिक पातळीवर सकारात्मक बदल दिसतील. पार्टनरशिप व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. सहाकाऱ्यांचा अपेक्षित मार्गदर्शन आणि सहयोग लाभेल. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळू शकतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)