गुरु शुक्रामुळे तयार झाला शक्तिशाली परिवर्तन राजयोग! या राशींचं नशिब फळफळणार
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीनुसार भाकीत वर्तवलं जातं. गुरु शुक्राच्या स्थितीमुळ असाच योग असणार आहे. कारण हे दोन्ही ग्रह गुरुच्या भूमिकेत आहेत. शुक्र ग्रह दैत्यगुरु आहेत. तर बृहस्पती हा देवगुरु आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे शक्तिशाली परिवर्तन राजयोग तयार होणार आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर...

12 राशी, 9 ग्रह आणि 27 नक्षत्र यांचं गणित पाहून ज्योतिष भाकीत करत असतात. त्यामुळे ग्रहांची स्थिती बदलली की भाकीतही बदलतं. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. शुक्राला दैत्यगुरू म्हणून संबोधलं जातं. तर बृहस्पती हा देवगुरु आहे. या दोन्ही ग्रहांची आपआपली खासियत आहे. शुक्र हा भौतिक सुखांचा कारक आहे. प्रेम आकर्षण, विवाह आणि दांपत्य सुखासाठी हा ग्रह कारक मानला जातो. गुरु हा ग्रह ज्ञान, शिक्षा, धन , संतान, धर्म आणि प्रगतीचा कारक मानला जातो. त्यामुळे या दोन्ही ग्रहांमध्ये विरोधाभास आहे. सध्या बृहस्पती हा ग्रह वृषभ राशीत विराजमान आहे. या राशीचा शुक्र हा स्वामी आहे. तर शुक्र हा गुरुच्या मीन राशीत विराजमान आहे. त्यामुळे दोन्ही ग्रहात विरोधाभास असला तरी एकमेकाच्या घरात असले की इजा पोहोचवत नाहीत. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे परिवर्तन योग तयार झाला आहे. शुक्र ग्रहाने 28 जानेवारीला मीन राशीत प्रवेश केला आहे. तर गुरु ग्रह वृषभ राशीत गेल्या वर्षभरापासून विराजमान आहे. 1 मे रोजी गुरु मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यात शुक्राला राहुचं बळही मिळणार आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात याबाबत सविस्तर
या तीन राशींना मिळणार लाभ
मेष : या राशीच्या 11 व्या स्थानात शुक्र आहे. तर गुरुमुळे धनभावात परिवर्तन योग तयार होत आहे. यामुळे मेष राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. कमी मेहनत करूनही जास्त फळ मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. इतकंच काय अडकलेले पैसाही परत मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी असलेल त्रास कमी होईल. नव्या नोकरीची ऑफर मिळू शकते.
मीन : या राशीतच शुक्र ग्रह विराजमान आहे आणि ही रास गुरुची आहे. त्यात गुरु तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला दिसेल. बोलण्याचालण्यात फरक जाणवून येईल. एखाद्या कामावर तुमचा प्रभाव दिसून येईल. तुम्ही किचकट कामही सहज पूर्ण करू शकता असा काळ आहे. खर्च कमी झाल्याने बचत वाढेल. तसेच गुंतवणुकीसाठी नवे पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध होतील. मानसिक ताणही कमी होईल.
कन्या : या राशीच्या जातकांनाही परिवर्तन राजयोगचा लाभ मिळेल. शुक्र सातव्या स्थानात असल्याने वैवाहिक जीवन सुखकर आणि भागीदारीच्या धंद्यात यश मिळण्याची शक्यता आहे. उद्योग धंदा, नोकरीमध्ये प्रगती दिसून येईल. मागच्या काही दिवसांपासून नोकरीत असलेल्या अडचणी दूर होतील. तुम्हाला एखादी मोठी पोस्ट मिळू शकते. तुम्ही तुमच्या हाताखाली असलेल्या लोकांकडून चांगल्या प्रकारे काम करून घेऊ शकता.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)