नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राहु-शुक्र युती! तीन राशींना असा होणार फायदा

वर्ष 2025 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राहु आणि शुक्राची युती होणार आहे. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम होईल. पण तीन राशींना या युतीचा फायदा होईल.

नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राहु-शुक्र युती! तीन राशींना असा होणार फायदा
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 2:37 PM

ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यातच शुक्र आणि राहुची युती होणार आहे. राहु आणि शुक्र यांच्यात मित्रत्वाचं नातं आहे. राहु आणि शुक्राचा स्वभाव जवळपास मिळताजुळता आहे. त्यामुळे ही युती फायद्याची ठरते, असं ज्योतिष्यांचं म्हणणं आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे व्यक्तीला भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकते. या दोन्ही ग्रहांच्या युतीला लंपट योग म्हणतात. राहु शुक्र ग्रहासोबत असेल तर शुभ परिणाम देतो. द्रिक पंचांगानुसार, शुक्र 28 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजू 12 मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत राहु ग्रह आधीच ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे राहु आणि शुक्र एकत्र येतील. शुक्रसोबत आल्याने राहुचा दुष्प्रभाव कमी होईल. कारण राहु हा दैत्यगुरु शुक्राचा शिष्य असल्याचं मानलं जातं. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना युतीचा लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या त्या..

या राशींना होणार फायदा

कर्क: या राशीच्या दशम स्थानात राहु आणि शुक्राची युती होणार आहे. त्यामुळे कामात तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील. तुम्ही काम करत असलेल्या क्षेत्रात नावलौकीक मिळेल. कमी मेहनतीत जास्त फळ मिळेल. नव्या वर्षात खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात होईल. आर्थिक प्रगतीची दारं खुली होतील. तसेच विदेशात जाण्याचं स्वप्नही पूर्ण होणार आहे. कुटुंबाचा तुम्हाला प्रत्येक कामात पाठिंबा मिळेल.

तूळ : या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यात शुक्र आणि राहुची युती सातव्या स्थानात होणार आहे. त्यामुळे ही युती शुभ प्रभाव टाकेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात त्याचे शुभ परिणाम दिसतील. गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक पातळीवर सुरु असलेले वादही संपुष्टात येतील. नोकरीत अपेक्षित यश मिळेल तसेच पगारवाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील.

वृश्चिक : या राशीच्या षष्टम स्थानात शुक्र आणि राहु एकत्र येत आहेत. त्यामुळे शत्रूहानी टळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून असणार शत्रूपीडा दूर होईल. दुसरीकडे, अचानक धनलाभ होण्याची शक्ता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना अपेक्षित नोकरी मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना अपेक्षित यश मिळेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.