22 जानेवारीपासून शनि-यम यांची अद्भूत स्थिती, अर्धकेंद्र योगामुळे तीन राशींचं नशिब चमकणार

ग्रहमंडळात ठराविक कालावधीनंतर ग्रहांची स्थिती बदलत असते. या ग्रहांच्या युती आघाडीमुळे काही शुभ अशुभ योग तयार होत असतात. असाच एक दुर्मिळ योग शनि आणि यम ग्रहामुळे 22 जानेवारीला तयार होत आहे.

22 जानेवारीपासून शनि-यम यांची अद्भूत स्थिती, अर्धकेंद्र योगामुळे तीन राशींचं नशिब चमकणार
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 4:16 PM

राशीचक्रात तसं पाहिलं तर नऊ ग्रहांचं गणित मांडलं जातं. पण प्लूटो ग्रहाची स्थितीही तितकीच महत्त्वाची मानली जाते. प्लूटो ग्रहाला यम ग्रह असंही संबोधलं जातं. त्यामुळे या ग्रहाची स्थितीही राशीचक्रावर परिणाम करणारी असते. यम ग्रह एका राशीत जवळपास 17-18 वर्षे विराजमान असतात. नोव्हेंबर 2021 मध्ये प्लूटो अर्थात यम ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला होता. आता 27 मार्च 2039 पर्यंत याच राशीत राहणार आहे. दुसरीकडे, न्यायदेवता शनिदेव 30 वर्षांनंतर एका राशीत फिरून येतात. तसेच जातकाच्या कर्मानुसार फळं देतात. 22 जानेवारीला शनि आणि यम ग्रहाची एक अद्भुत स्थिती राशीचक्रावर परिणाम करणारी असणार आहे. 22 जानेवारील 2024 रोजी दोन्ही ग्रह सकाळी 9 वाजून 24 मिनिटांनी एकमेकांपासून 45 डिग्रीत असणार आहेत. यामुळे अर्धकेंद्र योग तयार होणार आहे. यामुळे काही राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या राशींबाबत

कन्या : अर्धकेंद्र योग या राशीच्या जातकांसाठी लाभदायक ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काम करत असलेल्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

तूळ : या राशीसाठी हा कालावधी अंत्यत चांगला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अध्यात्मिक वाटचालीला गती मिळेल. अध्यात्मिक उन्नती होईल. धार्मिक आणि तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेण्याचा योग जुळून येईल. नोकरी धंद्यात अपेक्षित यश मिळेल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील.

मीन : या राशीला साडेसाती सुरु आहे. असं असलं तर अर्धकेंद्र योग लाभदायी ठरेल. या काळात यशाची नवी शिखरं गाठाल. आपण जसं बोलू तसं काही तरी घडताना दिसेल. कौटुंबिक पातळीवर तुमच्या शब्दाला मान असेल. तुम्ही बोलाल तसं वागण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे कामंही झटपट होतील आणि अपेक्षित यश मिळेल.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.