Astrology: पत्रिकेतील बलवान सूर्य करू शकतो मालामाल, अशा प्रकारे करा सूर्याची उपासना
ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य देव वरचा असतो त्यांना करिअर, मान-सन्मान, लाभ आणि प्रशासकीय लाभात चांगले यश मिळते. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमजोर किंवा इतर ग्रहांमुळे पीडित असेल तर..
मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हटले आहे. म्हणजे कुंडलीत सूर्याची स्थिती (Sun in kundali) चांगली असेल तर त्या व्यक्तीला अर्थारजनाचे योग्य मार्ग मिळतात. तसेच व्यहारीक जगात चांगले संबंध राहतात. याउलट कुंडलीत सूर्याची स्थिती अशुभ असेल तर त्या व्यक्तीचे व्यवहारीक संबंध खराब राहतात. नोकराच्या ठिकाणी वरीष्ठांची नाराजी ओढावल्या जाते. कुंडलीत सूर्य कमजोर असल्यास हृदय आणि डोळ्यांशी संबंधित आजार उद्भवू शकतात. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला आदर, उच्च स्थान आणि नेतृत्व क्षमता यांचा कारक मानला जातो. सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे.
सूर्यदेव मेष राशीमध्ये उच्च आणि तूळ राशीमध्ये दुर्बल आहेत. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य देव वरचा असतो त्यांना करिअर, मान-सन्मान, लाभ आणि प्रशासकीय लाभात चांगले यश मिळते. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमजोर किंवा इतर ग्रहांमुळे पीडित असेल तर ते व्यक्तीला हृदय आणि डोळ्यांशी संबंधित रोग देतात. याशिवाय पित्त आणि हाडांशी संबंधित समस्या निर्माण करतात. म्हणूनच कुंडलीत सूर्यदेव बलवान असणे खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर सूर्याला सकारात्मक बनवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. जे केल्याने माणसाचे नशीब उजळू शकते. जाणून घेऊया या उपायांबद्दल…
पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा
जर तुम्हाला सूर्यदेवाचा आशीर्वाद हवा असेल तर रविवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली चार मुखी दिवा लावा. असे केल्याने संपत्ती वाढते असे मानले जाते.
आदित्य हृदय स्तोत्र वाचा
रविवारी आदित्य ह्रदयाचा पाठ करा. यासोबतच ‘ओम सूर्याय नमः’, ‘ओम ह्रीं ह्रीं सूर्यम नमः’, ‘ओम घृणि: सूर्यादित्योम’ आणि ‘ओम ह्रीं ह्रीं ह्रीं स: सूर्य: नमः’ या मंत्रांनी सूर्यदेवाची पूजा करता येते. असे केल्याने आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर जी कामे होत नाहीत ती पूर्ण होतात.
या गोष्टी दान करा
रविवारी कोणत्याही गरजू किंवा गरीबाला तांबे आणि गहू दान करावे. असे केल्याने तुम्ही सूर्य दोषापासून मुक्त होऊ शकता. यासोबतच आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
सूर्यदेवाला जल अर्पण करा
सूर्यदेवाला रोज जल अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यात हळद टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. असे केल्याने सूर्याची कृपा प्राप्त होते.
रविवारी या गोष्टी खाणे टाळा
ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर रविवारी तेल आणि मीठ कधीही खाऊ नये. सूर्य ग्रहाला शांत ठेवण्यासाठी माणिक रत्न धारण करणे शुभ मानले जाते. घराची पूर्व दिशा वास्तुनुसार व्यवस्थित ठेवावी. यामुळे सूर्यग्रह शांत राहून शुभ परिणाम मिळत राहतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)