Astrology: 2023 च्या सुरवातीला या राशींना लागणार साडेसाती, शनीचा प्रकोप कमी करण्यासाठी करा हे उपाय
2023 या वर्षांमध्ये वर्षाच्या सुरवातीलाच काही राशींसाठी शनीची साडेसाती सुरु होत आहे. साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय जाणून घेऊया.
मुंबई, सर्व ग्रहांमध्ये शनि (Shani) हा सर्वात संथ मार्गक्रमण करणारा ग्रह आहे. त्यामुळे या ग्रहाचा प्रभाव कोणत्याही राशीच्या लोकांवर दीर्घकाळ दिसून येतो. न्यायाचा कारक म्हणून या ग्रहाची ओळख आहे. शनीची सावली (Sadesati) कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात खूप उलथापालथ घडवून आणते. शनिदेवाच्या कृपेशिवाय कोणतीही व्यक्ती कधीही उच्च स्थान प्राप्त करू शकत नाही अशी जोतिषशास्त्रात मान्यता आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यासाठी एकूण अडीच वर्षे लागतात.
नवीन वर्षात या राशीला लागणार साडेसाती
17 जानेवारी 2023 पासून शनि त्याच्या मूळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे अनेक राशींवर शनीची साडेसाती आणि अडीचकी सुरू होईल. सध्या शनि त्याच्या स्वतःच्या राशीत मकर राशीत भ्रमण करत आहे. यामुळे मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर अडिचकीचा प्रभाव राहील.
याशिवाय धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती चालू आहे. पण 17 जानेवारीला शनि गोचर करत असताना कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर मकर, कुंभ आणि धनु राशीची साडेसाती संपेल. मिथुन आणि तूळ देखील अडिचकीपासून मुक्त होतील.
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय-
- शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी शनि मंदिरात तेलाचे दान करावे.
- शनिवारी गरिबांना अन्नदान करा.
- पितरांचे स्मरण करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा.
- शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)