Astrology : वर्षाच्या शेवटी गुरू करणार राशी परिवर्तन, या राशीचे लोकं होणार मालमाल
वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 07.08 वाजता गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. गुरु ग्रह प्रत्यक्ष मेष राशीत असेल. हे त्या सर्व राशींना अडथळ्यांपासून मुक्त करेल. गुरूला राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 12 वर्षे लागतात.
मुंबई : 2023 वर्षाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत चालली आहे. नोब्हेंवर महिना अर्धा उलटल्यात जमा आहे. वर्षाचा शेवट काही राशीच्या लोकांसाठी गोज जाणार आहे. जोतिषी पराग कुळकर्णी याबद्दल माहिती दिली आहे. ज्योतिषशास्त्रात (Astrology 2024) ग्रहांची प्रतिगामी आणि प्रत्यक्ष स्थिती महत्त्वाची मानली जाते. वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 07.08 वाजता गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. गुरु ग्रह प्रत्यक्ष मेष राशीत असेल. हे त्या सर्व राशींना अडथळ्यांपासून मुक्त करेल. गुरूला राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 12 वर्षे लागतात. हा ग्रह शुभ फळ देणारा मानला जातो. गूरू हा स्वभावाने उदात्त, दयाळू आणि सकारात्मक मानला जातो. हा ग्रह शरिरातील रक्त, धमन्या, पाय आणि चरबी यांच्यावर प्रभाव टाकतो. याशिवाय उच्च शिक्षण, समुपदेशक, बँक, धार्मिक गुरु आणि मनोरंजनाशी संबंधित क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतो.
गुरूच्या राशी परिवर्तनाचा या राशींना फायदा होईल
मेष
मेष राशीच्या लोकांच्या नवव्या आणि बाराव्या घराचा स्वामी गुरु आहे. बृहस्पति तुम्हाला तुमच्या अडचणीतून बाहेर काढण्यास मदत करेल. या राशीचे लोकं महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. अध्यात्माकडे कल राहील. या काळात वजनही वाढू शकते. अशा परिस्थितीत, आपल्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील.
वृषभ
वृषभ राशीत 8व्या आणि 11व्या घराचा स्वामी गुरु आहे. देवगुरू तुम्हाला आराम देईल. या काळात घरातील वातावरण सुधारेल. व्यवसाय आणि नोकरीत गुरु तुम्हाला मदत करेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन योजनेत यश निश्चित आहे. व्यावसायात केलेले बदल फायद्याचे ठरतील.
मिथुन
मिथुन राशीच्या 10 व्या आणि सातव्या घराचा स्वामी गुरु आहे. गुरूचे थेट भ्रमण असल्याने वैवाहिक जीवन आणि व्यावसायिक जीवनातील समस्या संपतील. ज्या लोकांची पदोन्नती बाकी आहे. तो अपेक्षा करू शकतो. वैवाहिक जीवनात अडचणी येत होत्या. त्यांना दिलासा मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)