Astrology: या राशींसाठी 31 ऑगस्टपर्यंत शुभ काळ, शुक्राची बरसणार कृपा
शुक्र हा शुभ ग्रह मानला जातो. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला भौतिक, शारीरिक आणि वैवाहिक सुख प्राप्त होते. वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. मीन उच्च आणि कन्या नीच आहे.
7 ऑगस्टला शुक्राचे राशी (Venus Transit) परिवर्तन झाले. शुक्राचे संक्रमण काही राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणेल. शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत गेला आहे. त्याच वेळी, 31 ऑगस्टपर्यंत या राशीतच राहील. ज्योतिषशास्त्रात (Astrology) शुक्र हा शुभ ग्रह मानला जातो. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला भौतिक, शारीरिक आणि वैवाहिक सुख प्राप्त होते. वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. मीन उच्च आणि कन्या नीच आहे. ग्रहांपैकी बुध आणि शनि हे शुक्राचे मित्र मानले जातात. जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी शुक्राचे संक्रमण फायदेशीर ठरेल.
- मेष- अवघड गोष्टी सोप्या होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीनुसार यश मिळेल. व्यवसाय आणि नोकरीमध्ये सर्व काही ठीक होईल. कामात सहकारी तुमचा हेवा करू शकतात. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
- मिथुन- वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल होतील. नोकरीत मान-सन्मान राहील. या काळात प्रत्येक कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील.
- सिंह- या काळात आर्थिक स्थिती मजबूत राहील. वाहन खरेदीचे योग येतील. कौशल्य आणि बुद्धीने कामे पूर्ण कराल. सासरच्यांशी चांगली चर्चा होईल. संबंध सुधारतील. जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
- कन्या- या काळात मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. शुक्राचे संक्रमण जीवनात आनंद आणेल. नवीन मित्र बनवू शकतात. अज्ञात स्त्रोताकडून पैसे मिळू शकतात. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)