Astrology: या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात मिळेल अपेक्षित यश, वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील

हुशारीचा वापर करून काम केलं तर त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. मोठे व्यवहार टाळा. आज शक्यतो आराम करा. अधिकचा ताण घेऊ नका. गोष्टी मनाजोग्या होतील फक्त थोडा वेळ द्या.

Astrology: या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात मिळेल अपेक्षित यश, वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील
राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 5:40 AM
  1. मेष- मंगल कार्यांसाठी शुक्रवार शुभ असेल. तुमचं मन प्रसन्न होईल. बर्‍याच दिवसानंतर तुम्हाला कुणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करणे फायद्याचे ठरेल. कोर्टाच्या खटल्यांमधून सुटका होऊ शकते. दिवस चांगल्या बातमीने प्रारंभ होणार आहे.
  2. वृषभ- नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. दिवस अतिशय खास बनविण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल, मन प्रसन्न होईल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. काही नवीन काम सापडेल.
  3. मिथुन- तुमचा दिवस चांगला सुरू होणार आहे. तुम्हाला व्यवसायात देखील फायदा होणार आहे. याशिवाय नोकरीत पदोन्नती मिळेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. मित्र किंवा कुटुंबियांसह तुमचा चांगला प्रवास होईल, एकमेकांशी चांगला वेळ घालवाल.
  4. कर्क- शिक्षण घेण्याऱ्यांसाठी शुक्रवार चांगला दिवस आहे. परिश्रमानुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने होईल. कुटुंबाचं प्रेम आणि सहकार्य मिळेल.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- तुमचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात फायदा होईल. नोकरीची परिस्थिती देखील चांगली राहील. तुम्हाला हवं तसं कामाचं फळ तुम्हाला मिळेल. कार्यक्षेत्रात आज पैशाची प्राप्ती होईल. मित्र, कुटुंबातील सदस्य आणि सहकारी तुम्हाला मदत करतील.
  7. कन्या- आज आरोग्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे. धनलाभ होण्याची संधी आहे.
  8. तूळ- हुशारीचा वापर करून काम केलं तर त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. मोठे व्यवहार टाळा. आज शक्यतो आराम करा. अधिकचा ताण घेऊ नका. गोष्टी मनाजोग्या होतील फक्त थोडा वेळ द्या.
  9. वृश्चिक- नव्या विचारानं पुढे जा. कामाच्या बाबतीत काही नवे व्यवहार कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊन देऊ नका.
  10. धनु- शुक्रवार  तुमच्यासाठी चांगला दिवस असेल. कामात यश मिळवून लाभ होईल. तुम्ही स्तुतीस पात्र ठरेल. भाग्य तुमच्या सोबत असणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल.
  11. मकर- आज तुमच्या नेतृत्त्वंक्षमतेची परीक्षा आहे. महत्त्वाची कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसे परत मिळतील. कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येकाचे आभार माना.
  12. कुंभ- तुमचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. मंगल कार्यात तुम्ही भाग घ्याल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केलं जाईल. शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व शक्य सहकार्य मिळेल.
  13. मीन- कुटुंबाकडून आज सुख मिळेल. मंगल कार्य किंवा समारंभात सामील व्हाल. एखाद्या विशेष व्यक्तीशी भेटणं आठवणीत राहील. कामासाठी दिवस चांगला आहे, नवीन उत्साह आणि उत्साह मनामध्ये दिसेल. प्रेम संबंधात यश मिळेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.