Astrology 2024 : 26 दिवस या राशींना मिळणार शुक्राचं पाठबळ, करिअर-उद्योगधंद्यात मिळेल यश!
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाने मकर राशीत गोचर केलं आहे. यामुळे शुक्राचं पाठबळ तीन राशींना मिळणार आहे. त्यामुळे करिअर आणि उद्योगधंद्यात अपेक्षित यश मिळण्यासारखं ग्रहमान आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर
ग्रहांचं गोचर झालं की त्याचा परिणाम राशीचक्रावर होत असतो. 2 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजून 46 मिनिटांनी शु्क्र ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला आहे. या गोचरामुळे राशीचक्रावर परिणाम दिसणार आहे. काही राशींना चांगले, तर काही राशींना वाईट परिणाम भोगावे लागतील. तीन राशींच्या जातकांना या गोचराचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. 26 दिवस म्हणजेच 28 डिसेंबरपर्यंत शुक्राचं पाठबळ मिळणार आहे. शुक्र हा भौतिक सुखाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे धन दौलत आणि आरामाचं जीवन या कालावधीत उपभोगता येईल. चला जाणून घेऊयात तीन लकी राशींबाबत
मेष :या राशीच्या जातकांना शुक्राचं पाठबळ मिळणार आहे. या राशीच्या दशम स्थानात शुक्र ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे या कालावधीत आर्थिक स्थिती मजबूत होईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेला पैसा मिळेल. तसेच करिअरमध्ये प्रगती अनुभवयाला मिळेल. समाजात मानसन्मान मिळेल. लग्नकार्य किंवा कौटुंबिक कार्यात तुमचं कौतुक होईल. सासरच्या मंडळीकडून तुम्हाला संकटात मदत होईल.
कन्या : या राशीच्या चतुर्थ स्थानात शुक्र गोचर करणार आहे. त्याचे चांगले परिणाम करिअरमध्ये दिसून येतील. व्यवसाय करणाऱ्या जातकांना अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या पैशांशी निगडीत अडचणी दूर होतील. तसेच पैसा हातात खेळता राहील. या कालावधीत योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल.
मीन : या राशीच्या एकादश भावात शुक्राचं गोचर होणार आहे. या राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. भागीदारीच्या धंद्यात जोडीदाराकडून ठरल्याप्रमाणे काम होईल. त्यामुळे आर्थिक कोंडी फुटेल आणि प्रगतीचे द्वार खुले होतील. आरोग्य विषयक तक्रारी या कालावधीत कमी होतील. लग्नासाठी मनासारखी स्थळं या कालावधीत चालून येतील. योग्य जोडीदाराची निवड करा. मुलांच्या शिक्षणात प्रगती दिसेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)