Astrology: लाखांमध्ये एखाद्याच्याच हातावर असते हे भाग्याचे चिन्ह, तुमच्या हावर आहे काय?
हस्तरेषाशास्त्र हे भविष्य सांगण्याचे प्राचीन शास्त्र आहे. हातावरील विशेष चिन्हांचा काय अर्थ होतो हे जाणून घेऊया
मुंबई, हस्तरेषाशास्त्रात,(palmistry) एखाद्या व्यक्तीचे भविष्य त्याच्या हातावरील रेषा वाचून सांगितले जाते. या रेषांवरून तळहातावर काही भाग्यशाली चिन्हे देखील तयार होतात. हस्तरेषा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आपल्या हाताच्या रेषांवरून तळहातावर मासे, ध्वज, स्वस्तिक, कमळ आणि मंदिर अशा काही खुणा तयार होतात ज्या खूप शुभ (Lucky Sign) मानल्या जातात. या प्रकारच्या भाग्यवान चिन्हाचा देखील विशेष अर्थ आहे. याबद्दल आपण जाणून घेऊया.
- माशांची खूण- काही लोकांच्या तळहातावर, केतू किंवा चंद्राच्या पर्वतावर माशाचे चिन्ह अंडाकृती आकारात बनलेलं असतं. ही खूण तळहातावर ब्रेसलेट रेषेच्या अगदी खाली असते. असे म्हणतात की, ज्या लोकांच्या तळहातावर हे चिन्ह असते, ते समृद्ध असतात आणि धार्मिकतेकडे त्यांचा विशेष कल असतो. असे लोकं स्वभावाने खूप शांत असतात. अशा लोकांना पाण्याची खूप भीती वाटते आणि त्यांच्यामध्ये सायनसची समस्या देखील दिसून येते.
- ध्वज चिन्ह- मस्तकी रेषेतून किंवा जीवनरेषेतून बाहेर पडणारी सरळ रेषा गुरूच्या पर्वताकडे जात असेल आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला चौकोनी खूण असेल तर तळहातावर ‘ध्वज चिन्ह’ निर्माण होतो. ही खूण तर्जनी खाली अंगठ्याजवळ असते. हस्तरेषा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ज्या लोकांच्या तळहातावर हे चिन्ह असते, ते वृद्धापकाळात आनंदी जीवन जगतात. या लोकांची लेखन शैली उत्कृष्ट असते.
- स्वस्तिकचे चिन्ह- स्वस्तिकला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ही खूण तळहातावर दोन ठिकाणी असू शकते. बृहस्पति पर्वतावर (तर्जनीच्या खाली) आणि बुध पर्वतावर (अंगठ्याखाली). तर्जनी खाली बृहस्पति पर्वतावर स्वस्तिक असेल तर व्यक्तीची धार्मिक कार्यात रुची वाढते. अंगठ्याखाली बुध पर्वतावर स्वस्तिक असेल तर अशा लोकांना संपत्तीचा लाभ होतो. हे लोकं दान करण्यात कधीच मागे नसतात.
- कमळ चिन्ह- तळहातावर ह्रदय रेषेच्या दुसऱ्या टोकाला तर्जनी आणि मध्य बोटाखाली त्रिकोण दिसत असेल तर हस्तरेखाच्या जगात त्याला कमळ म्हणजेच कमळाचे चिन्ह म्हणतात. ज्या लोकांच्या तळहातावर ही खूण असते, ते धार्मिक आणि सज्जन असतात.
- मंदिर चिन्ह- गुरु पर्वतावर चौकोनी पेटीच्या वरच्या तर्जनी खाली असलेल्या त्रिकोणी चिन्हाला मंदिर चिन्ह म्हणतात. हे भाग्यशाली चिन्ह फार कमी लोकांच्या तळहातावर आढळते. असे म्हणतात की, ज्या लोकांच्या तळहातावर हे चिन्ह असते, ते खूप राजेशाही जीवन जगतात. त्यांना समाजात खूप मान मिळतो.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)