Astrology : या ग्रहाच्या अशुभ प्रभावाने वाढतात त्वचेशी संबंधीत समस्या, करा हे उपाय

बुध हा बुद्धिमत्ता, व्यापार, वाणी, त्वचा संपत्तीचा कारक मानला जातो. मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुध ग्रह बुद्धी तसेच त्वचेशी संबंधित आहे.

Astrology : या ग्रहाच्या अशुभ प्रभावाने वाढतात त्वचेशी संबंधीत समस्या, करा हे उपाय
बुध ग्रहImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 5:33 PM

मुंबई : प्रत्येक व्यक्तीवर ग्रहांचे शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात. नऊ ग्रहांपैकी बुधला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) बुध हा बुद्धिमत्ता, व्यापार, वाणी, त्वचा संपत्तीचा कारक मानला जातो. मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुध ग्रह बुद्धी तसेच त्वचेशी संबंधित आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत स्थितीत असतो किंवा एखादा अशुभ ग्रह प्रत्यक्ष दृष्टीक्षेपात असतो तेव्हा त्या व्यक्तीला त्वचेचे आजार होऊ लागतात. कधीकधी ते त्वचेच्या कर्करोगाच्या आजारास जन्म देते.

बुध दुर्बल असल्यास या समस्या उद्भवतात

जेव्हा बुध कमजोर असतो तेव्हा नाक आणि घशाचा त्रास देखील होतो. बुध स्मरणशक्तीशी देखील संबंधित आहे. बुध कमजोर असेल तर व्यक्तीला विसरण्याची समस्या असते. माणूस खूप लवकर विसरतो. अशुभ ग्रहांची स्थिती असल्यास व्यक्तीला बोलण्यात अडचण येते. समोरच्या व्यक्तीला अशा लोकांचे बोलणे सहजासहजी समजू शकत नाही.

जेव्हा कुंडलीत बुध शुभ असतो

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह शुभ स्थितीत असतो तेव्हा व्यक्तीची स्मरण शक्ती वाढते. असे लोकं तार्किकही असतात. मोठी संख्या सहज लक्षात ठेवली जाते. त्याच्या बोलण्याने लोक प्रभावित होतात. उत्साही असण्यासोबतच ते आपल्या सौंदर्याबाबतही दक्ष असतात.

हे सुद्धा वाचा

बुध मजबूत कसा बनवायचा

ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला बलवान बनवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम यांची पूजा करावी. दर बुधवारी श्री गणेशाला दुर्वा घास अर्पण करणे देखील लाभदायक आहे. बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घातल्याने बुधाची अशुभताही कमी होते.

या मंत्राचा रोज जप करा

बुधाचा मंत्र- ‘ओम ब्रान ब्राँ ब्रौं स: बुधाय नम:’

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.