Astrology : पाच ग्रहांची प्रतिगामी चाल ठरणार भाग्याची, या राशीचे लोकं होणार मालामाल
Astrology बुध आजपासून मागे सरणार आहे म्हणजेच प्रतिगामी होणार आहे. बुध हा धन, व्यापार, बुद्धिमत्ता, तर्क, संवाद इत्यादींचा कारक मानला जातो. शनि आणि शुक्र आधीच प्रतिगामी आहेत. याचा फायदा काही राशींना होणार आहे.
मुंबई : जोतिषशास्त्रात (Astrology) ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रह आपली राशी बदलतो, म्हणजेच मार्गक्रमण करत असततात. बुध आजपासून मागे सरणार आहे म्हणजेच प्रतिगामी होणार आहे. बुध हा धन, व्यापार, बुद्धिमत्ता, तर्क, संवाद इत्यादींचा कारक मानला जातो. शनि आणि शुक्र आधीच प्रतिगामी आहेत. तर राहू आणि केतू नेहमी मागे फिरतात. आज 24 ऑगस्ट 2023 रोजी एकूण 5 ग्रह प्रतिगामी झाले आहेत. या 5 ग्रहांच्या एकाचवेळी प्रतिगामी होण्याचा मोठा परिणाम होणार आहे. या ग्रहांच्या हालचालीतील बदलाचा 12 राशींवर परिणाम होईल. त्याच वेळी, काही राशी आहेत, ज्यांना या ग्रहांच्या हालचालीमुळे खूप फायदा होईल. चला, जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत.
या राशीच्या लोकांना होणार मोठा फायदा
मेष
आजपासून प्रतिगामी होणारे 5 ग्रह मेष राशीच्या लोकांचे भाग्य उजळतील. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. नोकरी आणि व्यवसायातही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. वडिलांशी संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी 5 ग्रहांची उलटी हालचाल खूप अनुकूल आहे. या लोकांचे उत्पन्न वाढेल. आनंदात वाढ होईल. परदेश दौऱ्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील. कुटुंबात सुख-समृद्धी येईल. जमीन, इमारत, वाहन खरेदी करू शकता. धनलाभ होईल.
सिंह
5 ग्रहांची पूर्वगामी गती सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. करिअरमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. समाजात मान-सन्मान राहील. पद, प्रतिष्ठा मिळेल. संतती होण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. अचानक कुठून तरी पैसे मिळण्याची शक्यता आहे.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी 5 ग्रहांची प्रतिगामी गती खूप फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. धनलाभ होऊ शकतो. उत्पन्न वाढेल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)