Astrology: 10 सप्टेंबरपासून ‘या’ राशीच्या लोकांचे सुवर्ण दिवस होणार सुरु, परीगामी बुध देणार शुभ फळ
बुधाच्या प्रतिगामी प्रभावाचा परिणाम सर्व राशींच्या नोकरी-व्यवसाय, शिक्षण, बुद्धिमत्ता, आर्थिक स्थितीवर होईल. जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली राशी आहेत, ज्यांच्यासाठी सुवर्ण दिवस लवकरच सुरु होणार आहे.
Astrology: बुध ग्रह (Mercury Planet) सध्या कन्या राशीत आहे आणि 10 सप्टेंबरपासून 2 दिवसांनी वक्री म्हणजेच परीगामी होणार आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत वक्री राहील आणि नंतर तो मार्गस्थ होईल. यानंतर बुध तूळ (Libra) राशीत प्रवेश करेल. बुद्धिमत्ता, व्यवसाय, संपत्तीचा कारक असलेल्या बुधाच्या हालचालीत बदल काही लोकांच्या जीवनावर खूप शुभ परिणाम देणार आहे. बुधाच्या प्रतिगामी प्रभावाचा परिणाम सर्व राशींच्या नोकरी-व्यवसाय, शिक्षण, बुद्धिमत्ता, आर्थिक स्थितीवर होईल. जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली राशी आहेत, ज्यांच्यासाठी सुवर्ण दिवस लवकरच सुरु होणार आहे.
- मिथुन- आर्थिक स्थिती मजबूत राहील- बुधाच्या प्रतिगामी हालचालीमुळे मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. कायदेशीर बाबींचे निराकरण होईल आणि निकाल तुमच्या बाजूने लागेल. कामाचा किंचित ताण जाणवेल.
- कर्क- धनलाभ होण्याची शक्यता- प्रतिगामी बुध कर्क राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ देईल. अर्थार्जनाच्या नवीन संधी येतील. कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो. स्वतःवर विश्वास ठेऊन काम करा यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. परदेश प्रवासाचे योग आहे.
- कन्या- कन्या राशीतच बुध प्रतिगामी आहे. त्याचा परिणाम या राशीच्या जातकांना . पैसा असेल, आर्थिक परिस्थिती चांगली राहील. तुम्ही कार-घर खरेदी किंवा बुक करू शकता. पती-पत्नीचे संबंध चांगले राहतील. त्यांच्या नात्यात गोडवा येईल. नवीन नाती तयार होतील. करिअरमध्ये प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. वाहन खरेदीचे योग आहेत.
- वृश्चिक- बुधाची वक्री चाल वृश्चिक राशीच्या जातकांना करियरसाठी लाभदायक ठरणार आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायात नफा होईल. नशिबाची साथ मिळाल्याने कामात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे नटे घट्ट होईल.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)