Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : होळी दहनाच्या दिवशी राशीनुसार केलेल्या या उपायांमुळे दुर होतील सर्व समस्या

असे मानले जाते की होलिका दहनानंतर प्रदक्षिणा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखे दूर होतात. चला जाणून घेऊया होलिका दहनाच्या वेळी राशीनुसार काय उपाय करावे.

Astrology : होळी दहनाच्या दिवशी राशीनुसार केलेल्या या उपायांमुळे दुर होतील सर्व समस्या
होली दहनImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 7:16 PM

मुंबई : हिंदू धर्मात होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेला प्रदोष काळात होते. होलिकेच्या (Holika Dahan 2023) दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र कृष्ण प्रतिपदेला होळी खेळली जाते. यावेळी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 7 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6.24 ते 8.51 पर्यंत असेल. होळी हा रंग, आनंद आणि आनंदाचा सण आहे. होलिकेच्या दिवशी समस्या दूर करण्यासाठी काही अचूक आणि राशीनुसार उपाय केले तर जीवन यशस्वी होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया या उपायांची संपूर्ण माहिती.

मेष

या राशीच्या लोकांनी आपली समस्या एका कागदावर लिहून तो नारळासोबत ठेवावा. त्याला कुंकू आणि अक्षता वाहाव्या होलिका दहनाच्या दिवशी होळीच्या अग्नीत हे नारळ अर्पण करावे. यामुळे तुमचे आरोग्य आणि इतर समस्या दूर होऊ लागतील.

वृषभ

या राशीचे लोकांनी होळीच्या दिवशी 11 पूजा सुपारी आणि 5 बदाम एका गुलाबी कपड्यात बांधाव्या. त्यावर चंचनाचे अत्तर लावा, त्यानंतर सात वेळा हळीची प्रदक्षीणा करा आणि होलिकेच्या अग्नीत ते अर्पण करा. यामुळे तुमच्या नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील.वृषभ राशीच्या विवाहितांनी होळीच्या दिवशी पत्नीला गुलाबी रंग लावावा, यामुळे वैवाहिक जीवनातील कलह दूर होईल.

हे सुद्धा वाचा

मिथुन

या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी गणपतीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि 27 मखाने गणेशासमोर ठेवाव्यात, त्यानंतर गणेश आणि चंद्रदेव यांची पूजा करावी, आपली समस्या सांगून हे मखाना होलिकेच्या अग्नीत अर्पण करावेत.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी होळीच्या दिवशी गव्हाच्या आणि तांदळाच्या पिठाचा गोल दिवा बनवा आणि त्यात तिळाचे तेल टाकून घराच्या मुख्य दारावर दिवा लावा. वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी जवाचे २७ दाणे घेऊन होलिकेच्या अग्नीत टाकावे.

सिंह

या राशीचे लोकांनी एक सुपारी त्यावर एक बताशा आणि एक जोडी लवंग  होळीच्या आगीत टाका, यामुळे तुमचे बिघडलेले काम होईल.

कन्या

11 दुर्वाच्या घ्या आणि त्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या हाताला लावून पूजेच्या ठिकाणी ठेवा, नंतर ते होलिकेच्या अग्नीत अर्पण करा, यामुळे तुमच्या मुलांना आणि कुटुंबाला फायदा होईल.कुटुंबातील सदस्यांचे वाईट नजरेपासून रक्षण होईल.

तुळ

होळीच्या दिवशी या राशीचे लोकं पिंपळाचे एक संपूर्ण पान घेऊन त्यावर अखंड जायफळ आणि साखरेचे काही दाणे ठेवून ते संपूर्ण घरात फिरवावे, त्यानंतर होळीच्या आगीत वाहावे. यामुळे कौटुंबिक कलह संपेल आणि घरात आनंद येईल.

वृश्चिक

या राशीचे लोकांनी एक पान घेऊन त्यावर एक संपूर्ण सुपारी ठेवावी  त्यानंतर हनुमान जीचा ‘ओम हनुमते नमः’ मंत्राचा 27 वेळा जप करत होलिकेच्या अग्नीत टाकावे, यामुळे फायदा होईल. तुम्हाला शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळेल.

धनु

होळीच्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी सात रंगांचे इतके धान्य घ्यावे की ते जवळजवळ मूठभर होईल, त्यानंतर एक कोरडे खोबरे घेऊन ते वरून कापून त्यात सातही प्रकारची धान्ये भरावीत आणि पूजेच्या ठिकाणी हे नारळ कपाळाला लावून होलिकेच्या अग्नीत अर्पण करा, यामुळे तुमच्या नवग्रहांशी संबंधित समस्या दूर होतील.

मकर

मकर राशीच्या लोकांनी पिंपळाचे पान घेऊन त्यावर अर्धा मूठ काळे तीळ ठेवावे. हे पान आपल्या घराच्या पश्चिम दिशेला ठेवावे. होलिका दहन झाल्यावर संध्याकाळी हे पान आपल्या डोक्यावरून सात वेळा काढून त्याचा आहुती द्यावी. यामुळे वाईट नजर आणि कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होतील. व्यावसायिक संबंध सुधारण्यासाठी व्यावसायिक मित्रांना जांभळ्या रंगाचा गुलाल लावा.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या वयाची वर्षे मोजून तीतक्याच सुपाऱ्या अग्नीत टाकावे, यामुळे धन आणि मालमत्तेशी संबंधित वादातून सुटका होईल.

मीन

मीन राशीच्या लोकांनी हवन समारंभासाठी ही सर्व सामग्री घ्या, हळद, अख्खी सुपारी आणि कापूर घ्या आणि एका सुपारीवर ठेवा, आता यानंतर होलिकेच्या सात परिक्रमा करा आणि सर्व वस्तू अग्नीत टाका, यामुळे  तुमचे मन शांत आणि आनंदी होईल.यासोबतच तुम्हाला शारीरिक त्रासांपासूनही मुक्ती मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.