आजचे राशिभविष्य
Image Credit source: TV9 Marathi
Astrology: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
- मेष- नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. व्यवसायात हुशारीने गुंतवणूक करा. नवीन कामातून फायदा होईल.
- वृषभ- आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. नात्यांमध्ये आज सावधगिरी बाळगा. कोणाशीही भांडू नका.
- मिथुन- या राशीच्या व्यक्तींनी नोकरीत बदल करु नये. शिवाय आजच्या दिवशी गाडी काळजीपूर्वक चालवा. उधार दिलेले पैसे परत मिळतील.
- कर्क- ज्येष्ठ व्यक्तींकडून आज आशीर्वाद मिळणार आहे. कुटुंबात आनंद राहील. स्वतःच्या घराबद्दल योजना आखाल.
- सिंह- आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळणार आहे. कोणालाही पैसे उधार देऊ नका. मित्रांची साथ मिळणार आहे.
- कन्या- या राशीच्या व्यक्तींनी संध्याकाळपर्यंत आपलं काम पूर्ण करावं. आजच्या दिवशी अचानक दुखापत होईल. तुमच्या जोडीदाराचा आदर करा.
- तूळ- या राशीच्या व्यक्तींनी आज नवीन घर आताच खरेदी करु नये. स्थावर मालमत्तेची चिंता सतावेल. कुटुंबातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या.
- वृश्चिक- या राशीच्या व्यक्तींचा विदेश प्रवासाचा योग टळू शकतो. नोकरीत यश मिळेल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
- धनु- मनाची चिंता संपेल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. पैशांची उधळपट्टी टाळा.
- मकर- घरातील कलह संपुष्टात येईल. कुटुंबातील लोकांचा सल्ला घ्या. जोडीदाराचा आदर करा.
- कुंभ- उधार दिलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिक समस्या कमी होतील. दिवस आनंदात जाईल.
- मीन- ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. वाहन खरेदीचा निर्णय पुढे ढकला. नातेसंबंधात गोडवा येईल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)