Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांची जुनी इच्छा पुर्ण होणार
आजचे राशी भविष्य, जाणुन घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांचे वडिलोपार्जीत मालमत्तेचे प्रश्न लागणार निकाली
मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
- मेष- बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टीसाठीसाठी तुम्ही मेहनत करत आहेत ती सफल होणार आहे. आजच्या दिवशी कुटुंबातील वाद मिटतील. लांबचा प्रवास टाळा.
- वृषभ- मोठे व्यवहार अनुभवी लोकांच्या सल्ल्याने करा. वाहन काळजीपूर्वक चालवा. समाजात प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
- मिथुन- तसंच आजच्या दिवशी पैसे कोणालाही उधार देऊ नका. दिवस सामान्य जाईल. जुन्या प्रेयसी किंवा प्रियकराच्या आठवणीत रममाण व्हाल.
- कर्क- गेलेली वेळ पुन्हा येत नाही त्यामुळे आलास झटकून कमला लागा. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. धावपळ करावी लागेल.
- सिंह- व्यसनांपासून दूर राहा. पोटाशी संबंधित तक्रार जाणवू शकते. उधार उसणवारी दिलेले पैसे परत मिळतील.
- कन्या- वडिलोपार्जित मालमत्तेचा प्रश निकाली लागेल. अनपेक्षीत धनलाभ होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल.
- तूळ- जोडीदाराकडून आदर मिळेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळणार आहे. चुकीच्या मित्रांपासून दूर राहा.
- वृश्चिक- प्रेम प्रकरणांसाठी चांगला दिवस आहे. रागावर नियंत्रण मिळवावं लागेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल.
- धनु- दिवस आनंदात जाईल. दररोजच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता. कामं टाळण्याची सवय सोडावी लागेल.
- मकर- महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या. घरात आज कोणत्याही कामामध्ये वडिलांचा सल्ला घ्या. नाते संबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
- कुंभ- या राशीच्या व्यक्तींचा मानसिक तणाव वाढेल. थोरामोठ्याचा सल्ला जरूर घ्या. नातेसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या
- मीन- आजच्या दिवशी तुमची जुनी इच्छा पूर्ण होईल. तुमच्याबद्दलची रहस्य कोणालाही सांगू नका. व्यापारात परिवर्तनाचे योग आहेत.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)