Astrology: जर तुम्हाला देखील दिसत असतील असे स्वप्न, तर समजून जा लवकरच चमकणार तुमचे नशीब
स्वप्नशास्त्र हा जोतिष्यशास्त्राचाच एक भाग आहे. या शास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टींचे दिसणे अतिशय शुभ मानल्या जाते.
मुंबई, आपण झोपेत अनेक प्रकारची स्वप्ने पाहतो. स्वप्न शास्त्रानुसार (Swapna Shastra), स्वप्ने हे एखाद्या गोष्टीचे सुचक स्वरूप असते. हे भविष्यात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही घटना दर्शवते. स्वप्न शास्त्रामध्ये या सर्वांचे तपशीलवार वर्णन केले आहे. आपण अशाच काही स्वप्नांबद्दल जाणून आहोत जे आयुष्यातील सकारात्मक बदलांबाबतचे सूचक संदेश देतात. तुम्हाला देखील असे स्वप्न पडत असतील तर स्वप्न शास्त्रानुसार अवश्य तुमच्या जीवनात देखील सकारात्मक बदल घडणार आहे.
- पांढरा कुत्रा: जर तुम्हाला स्वप्नात पांढरा कुत्रा दिसला तर ते शुभ संकेत मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात पांढरा कुत्रा दिसणे जीवनात आनंद आणि सकारात्मकता येण्याचे लक्षण आहे. यामुळे संपत्ती आणि प्रगतीचे योग निर्माण होतात. यासोबतच व्यवसायातही वाढ होत आहे.
- तीर्थयात्रा: जर तुम्ही स्वप्नात स्वतःला तीर्थयात्रेला जाताना अनुभवत असाल तर ते तुमच्यासाठी खूप शुभ मानले जाते. अशी स्वप्ने आयुष्यात घडणाऱ्या सकारात्मक घटनांकडे निर्देश करतात. असे स्वप्न पाहिल्याने तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते.
- पोपट: जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात बोलणारा पोपट दिसला तर ते तुमच्या आयुष्यातील चांगले नाते दर्शवते. अशी स्वप्ने तुमच्या नात्यातील गोडपणाचे प्रतीक आहेत. स्वप्न शास्त्रात पोपट दिसणे शुभ मानले जाते. हे आयुष्यात येणारे सुख आणि दर्शवते.
- शुभ्र ढग दिसणे: स्वप्नात ढग दिसणे शुभ लक्षण मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार मेघ व्यक्तीचे यश आणि सन्मान दर्शवतो. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात ढग निघून जाताना दिसले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात यश, पैसा दार ठोठावणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये झटपट प्रगती करू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही मेघगर्जनेचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला लवकरच काही चांगली बातमी मिळू शकते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)