Astrology : जुन महिन्यात या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध, बुधाचे राशी परिवर्तन देणार अशुभ परिणाम
ज्योतिषशास्त्रात बुध हा राजकुमार ग्रह म्हणून ओळखला जातो. 7 जून रोजी बुध वृषभ राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत, काही राशीच्या लोकांनी जून महिन्यात सतर्क राहणे आवश्यक आहे
मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) प्रत्येक ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. ग्रह त्यांच्या वेळेनुसार राशी बदलतात आणि प्रत्येक राशीवर ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम होतो. हे काहींसाठी सकारात्मक आणि काहींसाठी नकारात्मक असू शकते. ज्योतिषशास्त्रात बुध हा राजकुमार ग्रह म्हणून ओळखला जातो. 7 जून रोजी बुध वृषभ राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत, काही राशीच्या लोकांनी जून महिन्यात सतर्क राहणे आवश्यक आहे कारण बुधाचे हे संक्रमण या राशींसाठी वाईट काळ आणू शकते. या काळात अपयशाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हळूहळू तणाव वाढू लागतो. हाती घेतलेल्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या परिस्थीती कमकुवत राहील. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या कुंडलीत बुध मजबूत करायचा असेल तर ‘ओम नरसिंहाय नमः’ या मंत्राचा दररोज 41 वेळा जप करा.
या राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी अशुभ काळ सुरू होईल. बुधाच्या राशी बदलामुळे काळ खूप वाईट जाईल. या काळात कोणत्याही कामात यश मिळणार नाही. आरोग्यासंबंधीही अनेक समस्या निर्माण होतील. आर्थिक क्षेत्रात मोठी अडचण येईल. घरातील सर्व सदस्यांसोबत मतभेद होतील, त्यामुळे या काळात सर्व कामात यश मिळवायचे असेल तर ‘ओम नमः शिवाय’ 21 वेळा जप करा.
सिंह
बुधाच्या राशी परिवर्तनामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी खूप वाईट काळ सुरू होईल. त्वचेशी संबंधित समस्या असू शकतात. सर्दी, खोकला यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तब्येत बिघडू शकते. करिअरमध्ये यश मिळणार नाही. व्यवसायात यश मिळणार नाही. जीवनात नेहमीच उलथापालथ होत राहतील, त्यामुळे दररोज विष्णूचे नामस्मरण केल्याने तुमच्या जीवनात यश मिळू शकते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)