July 2023 : सिंह राशीत शुक्र आणि मंगळाची युती, तीन राशींना असा होईल जबरदस्त फायदा

राशीचक्रातील घडामोडींचा जातकांवर परिणाम होत असतो. ग्रहांची स्थिती, गोचर आणि बरंच काही परिणाम करत असतं. आता सिंह राशीत शुक्र आणि मंगळाची युती होणार आहे.

July 2023 : सिंह राशीत शुक्र आणि मंगळाची युती, तीन राशींना असा होईल जबरदस्त फायदा
July 2023 : शुक्र आणि मंगळाच्या युतीमुळे लग्न भंग योग, तीन राशींना मिळेल दोन ग्रहांचं पाठबळ
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 4:03 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रह, नक्षत्र आणि राशी यांचा एक अनोखा मिलाप पाहायला मिळतो. ग्रह नक्षत्र आणि राशींचं एक प्रकारे मांडणी केली जाते. त्यानुसार जातकांना भविष्य कथन केलं जातं. गोचर कुंडली हा प्रकार सर्वसमावेश म्हणून गणला जातो. त्याचा त्या त्या राशीवर थोड्या अधिक प्रमाणात परिणाम होत असतो. त्यामुळे वैयक्तिक कुंडली आणि गोचर कुंडलीतील ग्रह यानुसार जातकांना फळ मिळतं. जुलै 2023 महिन्यात ग्रहांचे गोचर होत आहेत. पहिल्याच आठवड्यात सिंह राशीत मंगळ आणि शुक्राची युती होणार आहे. शुक्र हा ग्रह धन, वैभव, ऐश्वर्य आणि भौतिक सुखांचा कारक ग्रह आहे. मंगळ हा ग्रह शौर्य, वीरता, साहस आणि क्रोध याचा कारक आहे.

ग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा असलेला मंगळ ग्रह 1 जुलै 2023 रोजी रात्री 2 वाजून 37 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. त्यानंतर शुक्र ग्रह 7 जुलै 2023 रोजी सकाळी 4 वाजून 28 मिनिटांनी सिंह राशीत येईल. त्यामुळे या दोन ग्रहांची युती होणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे लग्न भंग योग तयार होणार आहे. या योगाचा राशीचक्रावर परिणाम होईल. खासकरून तीन राशींना जबरदस्त फायदा होणार आहे.

तीन राशीच्या जातकांना जबरदस्त फायदा होणार

तूळ : या राशीच्या जातकांना मंगळ आणि शुक्राची युती लाभकारी ठरणार आहे. ही युती या राशीच्या एकादश भावात तयार होत आहे. हे स्थान उत्पन्न आणि लाभाचं स्थान आहे. त्यामुळे या काळात आर्थित स्थिती चांगली राहील. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. जुन्या गुंतवणुकीतून जबरदस्त फायदा होईल. त्यामुळे कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते.

वृश्चिक : या राशीच्या दशम स्थानात मंगळ आणि शुक्राची युती होत आहे. हे स्थान करिअर आणि व्यवसायाशी निगडीत आहे. त्यामुळे या काळात व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन आणि इंक्रिमेंट मिळू शकते. नवीन उद्योग धंदा करणाऱ्या जातकांना या काळात चांगला लाभ मिळेल. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील.

सिंह : या राशीतच मंगळ आणि शुक्राची युती होत आहे. म्हणजेच लग्न भावातील युती स्वभाव दर्शन घडवते. म्हणजेच या काळात जातकांच्या स्वभावात जबरदस्त फरक दिसेल. इतकंच काय तर आत्मविश्वास दुपटीने वाढला असून निर्णायक क्षमता वाढेल. काही नवीन कल्पना राबवाल आणि त्यातून नक्कीच फायदा होईल. समाजात मानसन्मान वाढेल. जोडीदाराची प्रगती झाल्याने त्याचा थेट फायदा तुम्हाला होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.