Astrology June 2023 : मेष राशीत शुभ अशुभ योगाची स्थिती, तीन राशींवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ग्रहांची स्थिती आपल्या जीवनावर रोज प्रभाव टाकत असते. प्रत्येक ग्रहाचा एक गुणधर्म आहे आणि त्यानुसार फळ मिळत असतं. ज्योतिषशास्त्रात शुभ ग्रह आणि पाप ग्रह अशी विभागणी केली आहे. त्यामुळे शुभ अशुभ युती घडत असतात. चला जाणून घेऊयात याबाबत
मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. तसेच त्यांचा गोचर कालावधी ठरलेला आहे. नऊ ग्रह, 27 नक्षत्र आणि 12 राशी असं हे ज्योतिषशास्त्राचं चक्र आहे, गोचर कालावधीत बऱ्याच गोष्टी घडत असतात. कधी कधी ग्रहांची चांगली स्थिती राशीचक्रावर सकारात्मक परिणाम करते. तर कधी वाईट स्थितीमुळे जातकांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं. चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असताना इतर ग्रहांसोबत युती आघाडी होत असते. त्यामुळे चंद्राची स्थिती काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. इतकंच काय तर शुक्ल पक्षातील चंद्र की कृष्ण पक्षातील चंद्र हे देखील पाहणं महत्त्वाचं असतं.
13 जून रोजी चंद्र मीन राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. दुपारी 1 वाजून 32 मिनिटांनी चंद्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. यामुळे दोन योग तयार होतील. गुरुच्या सान्निध्यात आल्याने गजकेसरी योग, तर राहुमुळे ग्रहण योग तयार होईल. चंद्र कृष्ण पक्षात असून उतरती कला आहे. त्यामुळे चंद्राचं बळ हवं तसं नसेल. त्यामुळे अशुभ योगात जास्त वाईट परिणाम दिसून येतील.
मीन – राशीचक्रात मीन ही बारावी रास असली तर गजकेसरी आणि ग्रहण योग या राशीच्या दुसऱ्या स्थानात तयार होत आहेत. त्यामुळे गजकेसरी योगामुळे या राशीच्या जातकांना फायदा होईल. पण ग्रहण योगाची स्थितीही यात स्थानात निर्माण होत आहे. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटू शकते. काही कामं होता होता राहून जातील. पैसा हाती आणि गेला अशी स्थिती पाहून मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. या अडीच दिवसात काळजी न करता. व्यवस्थापनावर लक्ष ठेवा आणि कामं पूर्ण करा.
मिथुन- मेष राशीतील चंद्र आणि गुरु युतीचा सकारात्मक प्रभाव वृषभ राशीवर पडेल. मिथुन राशीच्या एकादश भावात हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे या जातकांना गजकेसरी योगाचा लाभ मिळेल. पण ग्रहण योगामुळे काही कर्माची फळंही भोगावी लागतील. समाजात काही कारणांस्तव अपमान किंवा कुप्रसिद्धी अनुभवायला मिळेल. आर्थिक स्थिती चांगली असली तर पैसा कुठेतरी अडकलेला राहील. कौटुंबिक वातावरणात गोंधळ असल्याचं दिसून येईल.
कर्क – या राशीला शनिची अडीचकी सुरु असताना दशम भावात गजकेसरी योग आणि ग्रहण योग तयार होत आहे. चंद्र कृष्ण पक्षातील असल्याने ग्रहण योग गजकेसरी योगावर भारी पडेल. त्यात राशी स्वामी असल्याने जास्तीचा नकारात्मक परिणाम दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी काही कारणास्तव वाद होऊ शकतात. तसेच जवळच्या व्यक्तीकडून दगाफटका मिळण्याची शक्यता आहे. डोकं शांत ठेवून या काळात कामं करा. विनाकारण वाद घालू नका.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)