Budh Ast 2023 : बुध ग्रह वृषभ राशीत गोचर केल्यानंतर जाणार अस्ताला, तीन राशींची डोकेदुखी वाढणार

जून महिना सुरु झाला असून ग्रहांची स्थिती कशी असेल याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच बुध ग्रह गोचर करणार आहे. तसेच अस्ताला देखील जाणार आहे. त्यामुळे तीन राशींची डोकेदुखी वाढणार आहे.

Budh Ast 2023 : बुध ग्रह वृषभ राशीत गोचर केल्यानंतर जाणार अस्ताला, तीन राशींची डोकेदुखी वाढणार
Budh Ast 2023 : बुध ग्रहाची जून महिन्यातील स्थिती ठरणार त्रासदायक, तीन राशीच्या लोकांनी जरा सांभाळूनच
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 1:47 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळातील घडामोडी सामान्य जनजीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम करत असतात. त्यामुळे चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात. 2023 या वर्षातील जून महिना उजाडला असून या महिन्यात ग्रहांच्या स्थितीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह गोचर करणार आहे. दुसरीकडे, सूर्याच्या अगदी जवळ असल्याने बुध ग्रह काही दिवसानंतर अस्ताला देखील जाणार आहे. या स्थितीचा तीन राशीच्या लोकांना त्रास होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत असेल तर चांगल्या बुद्धिमत्तेसोबतच चांगलं आरोग्य मिळतं. पण बुध ग्रह अस्ताला गेल्यानंतर करिअर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.

बुध ग्रह या महिन्यात दोनदा राशी परिवर्तन करणार आहे. त्याचबरोबर अस्ताला देखील जाणार आहे. 7 जून 2023 रोजी बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 19 जूनला याच राशीत सकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी अस्ताला जाणार आहे. 24 जूनला अशाच स्थिती बुध ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल.

या तीन राशींनी जरा सांभाळूनच

वृषभ : बुध ग्रह या राशीच्या पहिल्या स्थानात गोचर करत काही दिवसांनी अस्ताला जाणार आहे. त्यामुळे जातकांना त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. खर्चात वाढ होईल त्याचबरोबर कौटुंबिक, मानसिक त्रास होऊ शकतो. कठोर परिश्रम केल्यानंतरही हाती हवं तसं यश मिळणार नाही. नोकरी करणाऱ्या जातकांना अपेक्षित इन्क्रिमेंट मिळणं कठीण होईल. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे.

कर्क : या राशीच्या एकादश भावात बुध ग्रह अस्त होणार आहे. यामुळे जातकाला नोकरी, उद्योग व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पदोन्नती आणि पगारवाढ होण्यात आडकाठी येऊ शकते. उद्योग व्यवसायातही नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती या काळात ढासळेल. केलेली बचत काही कामासाठी खर्ची करावी लागेल. प्रेम प्रकरणात अडचणींचा सामना करावा लागेल.

सिंह : या राशीच्या दशम स्थानात बुध ग्रह अस्ताला जाणार आहे. यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागून शकतो. नशिबाची साथ मिळणार नाही. त्यामुळे मानसिक संतुलन या काळात बिघडू शकते. प्लानिंगनुसार केलेली कामंही पूर्ण होत नसल्याने चिडचिड वाढेल. उद्योग धंद्यातही मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार नाही. ध्येय गाठण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागेल. कौटुंबिक वातावरणही गढूळ होऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.