तीन दिवसानंतर मंगळाची स्थिती बदलणार, या पाच राशींची आर्थिक स्थिती सुधारणार!

मंगळ ग्रह मिथुन राशीत गोचर करत काही काळ ठाण मांडून बसणार आहे. त्यामुळे राशीचक्रातील काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ फळं भोगावी लागणार आहेत.

तीन दिवसानंतर मंगळाची स्थिती बदलणार, या पाच राशींची आर्थिक स्थिती सुधारणार!
मिथुनेतला मंगळ देणार पाच राशींना पाठबळ, पैशांचा अडसर दूर करणारा कालावधी
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 7:25 PM

मुंबई : प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी काही ना काही तरी घेऊन येतो. प्रत्येक ग्रहाचा एक स्वभाव धर्म आहे आणि त्यानुसार ते फळ देतात. यावरच संपूर्ण ज्योतिषशास्त्र आधारित आहे असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला सेनापती असं संबोधलं गेलं आहे. साहस, पराक्रम, विवाह, भूमि, भाऊ या संबंधित मंगळाची फळं मिळतात. यावेळेस मंगळ ग्रह वृषभ राशीत आहे. तीन दिवसानंतर म्हणजेच 13 मार्च 2023 रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या काळात मंगळ ग्रह शनिसोबत नवपंचम योग तयार करणार आहे. त्यामुळे पाच राशीच्या जातकांना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या पाच राशी कोणत्या आहेत.

या राशींना मिळणार मंगळ गोचरा फायदा

मेष : या राशीचं स्वामित्व मंगळ ग्रहाकडे आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नक्कीच फायदा होईल. या काळात उर्जा आणि सकारात्मकता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना या काळात लाभ मिळेल. वडील आणि भावाचं चांगलं सहकार्य मिळेल. करिअरमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन : मंगळ राशी परिवर्तन करत याच राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना निश्चितच फायदा होणार आहे. मंगळ या काळात शुभ फळ देईल. संपत्तीशी निगडीत सौदा पूर्ण होईल. तसेच कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

सिंह : आर्थिक दृष्टीकोनातून मंगळ गोचर खूप महत्त्वाचं ठरणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. असं असलं तरी खर्चावर या काळात नियंत्रण ठेवा. त्यामुळे चांगली बचत होऊ शकते. धनलाभ आणि नवे आर्थिक मार्ग सापडतील. करिअरमध्ये प्रगती होण्याची दाट शक्यता आहे.

कन्या : मंगळ गोचरामुळे कन्या राशीच्या लोकांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौतुक होईल. व्यापाऱ्यात विस्तार होण्याची शक्यता आहे. नवे करार या काळात निश्चित होतील. तसेच आत्मविश्वास वाढेल.

मकर : मंगळ राशी परिवर्तनामुळे करिअरमध्ये मोठं यश मिळेल. नव्या नोकरीची ऑफर या काळात मिळू शकते. उत्पन्नात नक्कीत वाढ होईल. त्याचबरोबर आलेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक कार. प्रवासाचा योग या काळात जुळून येईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.