Astrology: बुध करणार मकर राशीत गोचर, ‘या’ राशींना येणार सुखाचे दिवस
बुध राशीचे मकर राशीत संक्रमण होणार आहे. याचा काही राशींना विशेष फायदा होणार आहे. यामध्ये तुमची रास आहे काय?
मुंबई, जोतिषशास्त्रात (Astrology) ग्रहाच्या राशी बदलला विशेष महत्त्व असते, बुध 28 डिसेंबर रोजी मकर राशीत प्रवेश करणार आहे, ज्यावर शनिदेवाचे राज्य आहे. शनिदेव आणि बुध यांच्यातील मैत्रीमुळे सर्व राशींवर बुधाचा संक्रमण प्रभाव दिसून येईल. त्याच वेळी, तीन राशींसाठी, हा काळ धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगतीचा योग राहिला. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.
मेष
बुध तुमच्या कुंडलीच्या दहाव्या घरात प्रवेश करणार आहे. दशम घर नोकरी, कामाचे ठिकाण मानले जाते. तुम्हाला अनेक ठिकाणांहून नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती किंवा वेतनवाढ मिळू शकते. वडिलांशी संबंध सुधारतील. वडिलोपार्जित संपत्तीचे सुख मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. आर्थिक बाबतीत भाग्य तुम्हाला साथ देईल.
सिंह
बुध तुमच्या कुंडलीच्या सहाव्या घरात प्रवेश करेल. हे घर शत्रू आणि आरोग्याचे मानले जाते. सिंह राशीच्या लोकांना जुन्या आजारापासून मुक्ती मिळू शकते. शत्रूंवर विजय मिळेल. तुम्ही तुमच्या धैर्यात आणि पराक्रमात वाढ पाहू शकता. संशोधन कार्यात व्यस्त असलेल्यांनाही या महिन्यात यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी टार्गेट पूर्ण करण्यात यश मिळेल.
तूळ
तुमच्या कुंडलीच्या चौथ्या भावात बुधचे भ्रमण होणार आहे. चौथे घर हे भौतिक सुखाचे आणि मातृस्थान मानले जाते. राजकारण आणि सामाजिक कार्याशी संबंधित लोकांचे भाग्य उजळेल. तुम्हाला इच्छित भौतिक सुख . आई आनंदी आणि निरोगी राहील. नवीन घर किंवा गाडी घेण्याचा वैचाहर करीत असाल तर ते स्वप्न पूर्ण होण्याचा योग आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)