लक्ष्मी उपाय
Image Credit source: Social Media
मुंबई : माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हटले जाते. असे म्हणतात की ज्या घरात लक्ष्मी वास करते त्या घरात कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता नसते. माता लक्ष्मीच्या कृपेशिवाय माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. यामुळेच जीवनातील प्रत्येक व्यक्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून श्रीमंत व्हायचे असते. जरी असे बरेच लोकं आहेत जे कठोर परिश्रमासह पुष्कळ पूजा-अर्चा करतात, परंतु ते नेहमी पैशाच्या कमतरतेमुळे व्यथित आणि अडचणीत राहतात. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), एखाद्या व्यक्तीच्या समस्यांचे कारण त्याच्या काही सवयी देखील असू शकतात. माणसाच्या काही सवयी असतात ज्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊन घर सोडून निघून जाते. त्या व्यक्तीच्या त्या सवयींबद्दल जाणून घेऊया.
या कारणांमुळे माता लक्ष्मी होते नाराज
- आळशी लोकांवर माता लक्ष्मी नेहमी रागावते. असे लोक कधीही यश मिळवत नाहीत आणि नेहमी गरिबीत राहतात. आळसापासून दूर राहिल्यासच देवी लक्ष्मीची प्राप्ती होते.
- घर अव्यवस्थित ठेवल्याने नशिबाला आमंत्रण मिळते आणि देवी लक्ष्मी रागावते. तसेच पलंगावर पडलेल्या घाणेरड्या व अस्वच्छ चादरी आणि खोलीत पसरलेला कचरा यामुळे दुर्दैवी घटना घडतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घराच्या आणि खोलीच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे.
- जर तुम्ही देखील सूर्यास्तानंतर घर झाडत असाल आणि पुसत असाल तर ही सवय लगेच सोडा. वास्तूशास्त्राच्या दृष्टीने ही अतिशय चुकीची सवय आहे. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि कुटुंबात कलह सुरू होतो, ज्यामुळे आर्थिक संकट निर्माण होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी कधीही घर झाडू नका.
- ताटात उष्टे अन्न कधीही ठेवू नये. याशिवाय कधीही न वापरलेली भांडी जास्त काळ ठेवू नयेत. यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होतो, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी सर्व खरकटी भांडी धुवावीत किंवा घराबाहेर ठेवावी.
- जे लोक यश मिळाल्यावर बढाई मारायला लागतात किंवा छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावतात, अशा व्यक्तीची साथ देवी लक्ष्मी लवकर सोडते. त्यामुळे अहंकार टाळा. तसेच, इतरांचा आदर करण्यास विसरू नका.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)