Rangpanchami Horoscope : रंगपंचमीला 5 राशींना मिळणार प्रेमात धोका, रंगाचा होणार बेरंग; वाचा तुमचं प्रेमजीवन कसं असेल
Love Life Horscope Reading : आज देशभरात रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात आज भगवान कृष्णांनी राधेला आज रंग लाऊन पंचमी साजरी केल्याची मान्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस प्रेमासाठी खास मानला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार आज हर्षण योग आणि वज्र योग तयार होत आहेत. याशिवाय आज देशभरात रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. होळीनंतर पाच दिवसांनी खेळल्या जाणाऱ्या या रंगपंचमीला राधा राणी आणि भगवान कृष्ण यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की प्राचीन काळी, भगवान श्रीकृष्ण पंचमीच्या तिथीला देवी राधासोबत होळी खेळत. त्यामुळे आजचा दिवस हिंदू धर्मात प्रेमासाठी चांगला मानला जातो. मात्र आजचा हा 19 मार्चचा दिवस तुमच्या प्रेमासाठी कसा असेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
मेष
रंगपंचमीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात आनंद येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. त्यांच्याशी बोलल्याने तुम्हाला बरे वाटेल. जे अविवाहित आहेत, त्यांचे नाते राधा-कृष्णाच्या आशीर्वादाने निश्चित होऊ शकते.
वृषभ
जर तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू असतील तर आज त्यांच्याशी स्पष्ट आणि शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करा. चर्चेतूनच समस्या सोडवली जाईल. एखादी भेटवस्तू देऊन तुम्ही तुमच्या जोडीदाराचा राग शांत करू शकतात.
मिथुन
ऑफिसच्या कामामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवता येणार नाही. जर तुम्ही तुमच्या मुलांसोबत आणि जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याचा प्लॅन केला असेल, तर तोही कामामुळे रद्द होऊ शकतो. जे अविवाहित आहेत त्यांनी आज आपल्या भावना व्यक्त न केलेल्याच चांगलं.
कर्क
ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे, त्यांनी त्यांच्या जोडीदारावर शंका घेऊ नये. नव दाम्पत्य जीवनाचा आनंद घ्या. जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही तर तुमच्या नात्यात हळूहळू अंतर वाढत जाईल. तर जे लोक बऱ्याच दिवसांपासून नात्यात आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. जोडीदार तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल.
सिंह
राधा-कृष्णाच्या आशीर्वादाने, सिंह राशीच्या व्यक्तींचे नातेसंबंध आज चांगले असतील. जोडीदारासोबत काही प्रेमाचे क्षण घालवाल. तुम्ही तुमच्या सोलमेटशी आज मनापासून मोकळेपणाने संवाद साधाल. त्यामुळे तुम्हाला छान वाटेल. याशिवाय, दिवस संपण्यापूर्वी डेटवर जाण्याचा प्लॅन देखील बनू शकतो.
कन्या
नातेसंबंधात असलेल्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून विश्वासघात होऊ शकतो. विवाहितांसाठी हा दिवस फारसा चांगला राहणार नाही. सकाळी कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. आज जोडीदाराशी वाद घालू नका.
तुळ
ज्या लोकांनी अलीकडेच नातेसंबंधात प्रवेश केला आहे, त्यांचे जोडीदाराशी भांडण होऊ शकते. जर तुम्ही कुठेतरी जाण्याचा प्लॅन केला असेल तर तोही काही काळासाठी पुढे ढकलला जाऊ शकतो. तथापि, विवाहित जोडप्यांसाठी हा दिवस सामान्य राहील.
वृश्चिक
जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पार्टीला जात असाल तर तिथे तुमचे त्यांच्याशी भांडण होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जोडीदाराशी जपून वागा. जर तुम्ही योग्य वेळी तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवले नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. प्रेमाची कबुली देण्यासाठी दिवस चांगला नाही. निराशा हाती येऊ शकते.
धनु
अविवाहित लोकांना पार्टी दरम्यान त्यांचे खरे प्रेम भेटू शकते. त्यातून एका चांगल्या नात्याची सुरुवात होईल. विवाहित लोक त्यांच्या जोडीदारासोबत चांगले आणि रोमँटिक क्षण घालवतील. त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील.
मकर
जर तुमच्या लग्नाची कुठेतरी चर्चा सुरू असेल, तर सध्या नातेसंबंध अंतिम करणे योग्य ठरणार नाही. मात्र नात्यात असलेल्या जोडप्यासाठी हा दिवस खूप चांगला जाणार आहे. तुमच्या सोलमेटशी एकांतात बोलल्याने तुम्हाला त्यांना समजून घेण्याची संधी मिळेल.
कुंभ
ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे त्यांना त्यांच्या जीवनसाथीला समजून घेण्याची संधी मिळेल. जे अविवाहित आहेत त्यांना प्रेमात यश मिळेल.
मीन
या राशीच्या लोकांनी आपल्या जोडीदारासोबत संवाद साधावा. एकमेकांबद्दल बरेच काही कळेल. यामुळे नाते मजबूत होईल. जे अविवाहित आहेत आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या लग्नासाठी जोडीदार शोधत आहेत, त्यांना कोणतीही चांगली बातमी आज तरी मिळणार नाही.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)