Astrology: या चार राशींचे लोकं असतात सोलो ट्रिपचे चाहते, त्यांना एकट्याने आयुष्य जगायला आवडतं
जेव्हा आपण कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करतो तेव्हा बऱ्याचदा हा प्लॅन कुटुंबाच्या किंवा मित्रांच्या डोक्यात येतात, परंतु काही जण असे असतात जे एकट्याने प्रवास करण्याचा आनंद घेतात. सोलो ट्रिपचे वेड असलेले हे लोकं कोणताही धोका पत्करायला घाबरत नाहीत.
आयुष्याच्या गजबजाटापासून दूर आपल्या आवडीच्या ठिकाणी जाऊन मौजमजा करायला कोणाला आवडत नाही. दुसरीकडे, त्या प्रवासात तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांची किंवा मित्रमंडळींची साथ मिळाली, तर सहलीची मजाही द्विगुणित होते, पण ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशीचे लोक असतात ज्यांना एकट्याने प्रवास करणे (Solo trip) आवडते. या राशीचे लोकं ज्यांना एकट्याने फिरण्याची आवड असते. त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक धोक्याला एकट्याने तोंड देण्याचे धैर्य असते. चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत.
- मेष- ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचे लोकं एकट्याने प्रवास करण्याचा धोका पत्करण्यास सक्षम मानले जातात. त्यांना जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा कुठल्यातरी साहसी ठिकाणी जाण्याला त्यांचे प्राधान्य असते.
- कन्या- कन्या राशीच्या लोकांबद्दल असे म्हटले जाते की, हे लोक जेव्हा कधी एकट्याने सहलीला जातात तेव्हा ते सर्वात आधी त्याच्या फायद्यांचा विचार करतात. प्रवासाचा आनंद घेण्याव्यतिरिक्त, हे लोक त्यांच्या प्रवासाची योजना विशिष्ट उद्देशाने करतात.
- धनु- धनु राशीचे लोकं फिरण्यासाठी कधीही शोधत नाहीत, ते एकट्याने प्रवास करण्याचा आनंद घेतात, मात्र सोलो ट्रिप दरम्यान, या लोकांना इतर लोकांना भेटणे आणि त्यांच्या संस्कृतीबद्दल जाणून घेणे आवडते.
-
मीन- ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांची कल्पनाशक्ती खूप आश्चर्यकारक असते. त्यामुळे या लोकांना स्वतःसोबत थोडा वेळ घालवण्यासाठी एकटे फिरणे आवडते. यांना हिल स्टेशनला जायला आवडते.
सोलो ट्रीपला जाण्यासाठी ही चार ठिकाणं आहे जगात भारी
कोवलम
केरळमधील कोवलमला किनाऱ्यांचं शहर म्हटलं जातं. इथलं निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखं आहे. इथं तुमच्यासाठी तुमच्या बजेटच्या सोलो ट्रीप उपलब्ध आहेत. हाउसबोटचा पर्यायसुद्धा याठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे. याशिवाय लाइटहाउस बीच, कोवलम बीच, हावा हे प्रसिद्ध बीचसुद्धा पाहता येतील.
सिक्किम
सोलो ट्रीपसाठी सध्या सिक्कीम हे एक चांगलं डेस्टिनेशन ठरत आहे. सिक्कीमचं निसर्ग सौंदर्य विशेष उल्लेखनीय आहे. बर्फाळ डोंगरांनी झाकलेली शहरं आणि तलाव हे इथलं वैशिष्ट्य आहे.
पॉन्डिचेरी
जर तुम्हाला भारतात राहून परदेशात जाण्याचा अनुभाव घ्यायचा असेल तर तुम्ही पॉन्डेचरी नक्कीच ट्राय करायला हवं. सोलो ट्रीपसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. याठिकाणी गर्दी आणि प्रदूषण नसल्यानं तुम्हाला खूप फ्रेश वाटतं. तसेच हे डेस्टिनेशन फारसं महागडंसुद्धा नाही. याठिकाणी अगदी माफक दरात राहण्या-खाण्याच्या सोई उपलब्ध आहेत.
बाली
इंडोनेशियामधील बाली बेट खूपच सुंदर पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. या ठिकाणी खवय्यांना वेगवेगळे पदार्थांची मेजवानी मिळते. हे फक्त हनीमून डेस्टिनेशनच नाही तर सोलो ट्रीपसाठीही उत्तम पर्याय आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)