Astrology : खोटं बोलण्यात तरबेज असतात या चार राशींचे लोकं, तुमची रास आहे का यात?
लग्न झालेले पुरूष तर हमखास खोटं बोलतात, मात्र काही राशींच्या लोकांना अगदी सहज खोटं बोलता येतं. मुख्य म्हणजे खोटं बोलूनही ते सहजा सहजी अडचणीत येत नाही.
मुंबई : जीवनात बऱ्याचा नाइलाजास्तव खोटं बोलावं लागतं. लग्न झालेले पुरूष तर हमखास खोटं बोलतात, मात्र काही राशींच्या लोकांना अगदी सहज खोटं बोलता येतं. मुख्य म्हणजे खोटं बोलूनही ते सहजा सहजी अडचणीत येत नाही. या लोकांना प्रामाणिकपणा वैगरे या गोष्टींशी फार घेणं देण नसतं. ते नेहमीच कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतात. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) 4 राशीचे लोकं फसवणूक किंवा हेराफेरी करण्यात अत्यंत कुशल असतात. ते खोटंही अगदी स्पष्टपणे बोलतात. जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत?
या राशींचे लोकं खोटं बोलण्यात असतात तरबेज
मिथुन
मिथुन राशीचे लोकं खोटे बोलण्यात तरबेज मानले जातात. हे कौशल्य ते फसवणुकीसाठी वापरतात. परिस्थितीनुसार ते वर्तन बदलतात. या राशीचे लोक बुद्धिमान आणि दुहेरी व्यक्तिमत्त्वाचे असतात.
वृश्चिक
या राशीचे लोकं तीव्र भावना आणि गुप्तता पाळण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. यामुळे ते सत्य लपवण्यात आणि इतरांना फसवण्यात माहीर बनतात. वृश्चिक राशीचे लोकं खूप आतल्या गाठीचे असतात. त्यांचा हेतू काय आहे याचा अंदाज ते कोणालाही लागू देत नाहीत.
धनु
धनु राशीचे लोकं फसवणूक आणि कपटाने भरलेले असतात. कधीकधी ते इतरांना प्रभावित करण्यासाठी खोटे बोलतात. ते आवश्यकतेनुसार काल्पनीक गोष्टी देखील तयार करू शकता.
मीन
मीन त्यांच्या सर्जनशीलता आणि कल्पनेसाठी ओळखले जातात, ज्यामुळे ते सत्य लपवतात. त्यांचा सहानुभूतीपूर्ण स्वभाव त्यांना खोटे बोलण्यात पारंगत करतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)