Astrology : या तीन राशीचे लोकं असतात अत्यंत स्वार्थी, तुमच्या जोडीदारीची रास आहे का यात?
ज्योतिषशास्त्रात (Astrology) 3 राशींचे वर्णन अतिशय स्वार्थी म्हणून केले आहे. ही लोकं स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात. खोटी स्तुती करण्यात हे लोकं तरबेज असतात.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशीचें वर्णण सांगितले आहेत. पृथ्वीवर जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती या 12 राशींपैकी एक आहे. राशीनुसार प्रत्त्येकाच्या स्वभावातही फरक असतो. त्यांच्या आवडी-निवडीही वेगळ्या असतात. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 3 राशींचे वर्णन अतिशय स्वार्थी म्हणून केले आहे. ही लोकं स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात. खोटी स्तुती करण्यात हे लोकं तरबेज असतात. आपला स्वार्थ साधण्यासाठी ते काहीही करू शकतात. हे लोकं नेहमी त्यांच्या फायद्यांचा विचार करतात. स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्याचा विश्वासघात करण्याण्यासाठीही हे लोक मागे-पुढे पाहत नाही. तथापि, या स्वभावामुळे ते जीवनात प्रगती मात्र खूप करतात. चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार या राशी कोणत्या आहेत?
या राशीचे लोकं असतात स्वार्थी
मिथुन
या राशीच्या लोकांच्या मनात एक आणि ओठावर एक असते. हे लोक खूप खुशामत करणारे आणि संभाषणात कुशल असतात. फायदा पाहून ते लगेच शब्द बदलतात. संधी मिळेल तेव्हा स्वतःच्या फायद्यासाठी मित्रांचाही विश्वासघात करायला तो मागेपुढे पाहत नाही. त्यांना स्वतःचा आदर आवडतो. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे जो त्यांना हा गुण देतो.
सिंह
सिंह राशीच्या लोकांना त्यांचा आदर नेहमीच हवा असतो. हे लोकं स्वभावाने खूप स्वार्थी असतात. इतरांची प्रगती पाहून त्यांना जळफळाट होते. आपले काम करून घेण्यासाठी हे लोक कधीही कोणाचीही फसवणूक करू शकतात. हे लोकं नेहमी स्वतःच्या हिताचा विचार करतात. या राशीचा स्वामी सूर्य देव आहे. त्यांच्याकडूनच त्यांना हे गुण मिळाले आहेत.
कन्या
हे लोक खूप स्वार्थी असतात. ते वेळ पाहून एखाद्या व्यक्तीची साथ धरतात आणि सोडतातही. त्यांचा स्वार्थ त्या व्यक्तीकडून पूर्ण होताच ते लगेच त्या व्यक्तीला सोडून जातात. हे लोकं त्यांच्या अडचणी किंवा संकटात कोणाचीही साथ देत नाहीत. कन्या राशीचे लोकं कोणाच्याही हिताची काळजी करत नाहीत. गरिबांना मदत करण्यात हे लोक आघाडीवर असतात. कन्या राशीचा स्वामी बुध आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)